NEET Paper Leak Protest Panaji Students Dainik Gomantak
गोवा

NEET Paper Leak: विद्यार्थ्यांनी पणजीत पुन्‍हा छेडले आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी

NEET Paper Leak Protest Panaji Students: ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत सुरू असलेल्‍या आंदोलनाला पाठिंबा देण्‍यासाठी राज्‍यातील शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी पुन्‍हा एकदा पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन छेडले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत सुरू असलेल्‍या आंदोलनाला पाठिंबा देण्‍यासाठी राज्‍यातील शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी पुन्‍हा एकदा पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन छेडले. परंतु, या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्‍या प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांना पणजी पोलिसांनी आझाद मैदानावर येण्‍यास मज्जाव केल्‍याने काँग्रेस नेते भडकले. राज्‍यातील पोलिस लाचार झाल्‍याची जहरी टीका काँग्रेस नेते ॲड. अमित पालेकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

वैद्यकीय अभ्‍यासक्रमासाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या ‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटल्‍याची बातमी बाहेर पडल्‍यानंतर देशभरात गदारोळ माजला आहे. या पेपरफुटीला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असल्‍याचा दावा करीत, त्‍यांनी तत्‍काळ आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अध्‍यक्ष अभिजीत दीपके यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

उपोषणाला बसलेल्‍या सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उपोषणस्‍थळावरून उचलून इस्‍पितळात दाखल केल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनाची धार वाढवली आणि संसदेवर मोर्चाचे नियोजन केले. परंतु, या मोर्चादरम्‍यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्‍यामुळे तरुणाईतील संताप अनावर झाला असून, या घटनेचा निषेध करण्‍यासाठी शेकडो विद्यार्थी बुधवारी सायंकाळी पुन्‍हा आझाद मैदानावर जमले.

या आंदोलनाला पाठिंबा देत प्रदेश काँग्रेसचे नेते आझाद मैदानावर आले. परंतु, पोलिसांनी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांना मैदानात येण्‍यास मज्जाव केल्‍याने इतर नेते खवळले. दरम्‍यान, या प्रकरणानंतर विद्यार्थी व काँग्रेस नेत्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करीत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्‍काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

‘आझादी’ हिरावली!

ॲड. अमित पालेकर यांनी आरोप केला की, भाजपच्या मोर्चामुळे मुख्य रस्ता बंद झाला तरी प्रदेशाध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ‘एफआयआर’ नोंदविण्यात आला. पोलिस सत्तेसमोर झुकल्याचे दिसते. आझाद मैदानात गिरीश चोडणकर यांना प्रवेश नाकारून ‘आझादी’ हिरावल्याची टीकाही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT