Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: 2 वाहनांची समोरासमोर टक्कर, ताबा सुटून गाडी कोसळली; गोव्यात अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

Goa Accident Death: राज्यात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये एका दुचाकीस्वारासह एक सहप्रवासी महिला ठार झाली.

Sameer Panditrao

मडगाव : राज्यात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये एका दुचाकीस्वारासह एक सहप्रवासी महिला ठार झाली.

नावेली ते वेर्णा पश्चिम बगलमार्गावर कंटेनर आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघात होऊन मूळ ओडिशा राज्यातील दुचाकीस्वार प्रसन्न कुमार बेहरा (वय ५२ वर्षे) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली.

शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात झाला. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर होऊन त्यात बेहरा यांचा मृत्यू झाला. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्यांना नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक संजय वेळीप हे अधिक तपास करीत आहेत.

दुचाकीस्वाराचा ताबा सुटला अन्...

वेर्ला-काणका येथील मिल्टन मार्कीस सर्कलजवळील रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात लक्ष्मी सावंथी (वय ४५ वर्षे, रा. पर्रा) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (ता. १८) सकाळी ८.३० च्या सुमारास घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मी या दुचाकीवर मागे बसल्या होत्या. काणका येथे चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने लक्ष्मी रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना गोमेकॉत दाखल केले असता, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT