Goa Crime Case 
गोवा

कॅसिनोची लत, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्यासाठी खेळलेल्या स्नूकर खेळाडूला घरफोडी आणि वाहन चोरीप्रकरणी अटक

सुलेमान शेखने 2023 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते.

Pramod Yadav

National Level snooker player arrested for house breakings and two-wheeler thefts in Goa: घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यात गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्नूकर खेळाडूचाही समावेश आहे. या दोघांचाही घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्नूकर खेळाडूने नुकतेच नॅशनल गेम्समध्ये भाग घेतला होता. या स्नूकर खेळाडूने नुकतेच नॅशनल गेम्समध्ये भाग घेतला होता. स्नूकरपटू सुलेमान शेख आणि त्याचा साथीदार शब्बीरसाहेब शालावाडी यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर घरफोडी आणि वाहन चोरीचा आरोप आहे.

सुलेमान शेखने 2023 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते. दोघांनाही कॅसिनोचे व्यसन होते, त्यामुळे त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

संशयित आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींविरुद्ध उत्तर गोव्यातील पर्वरी येथे दोन घरफोडी, म्हापसा आणि मार्दोळ येथे प्रत्येकी एक आणि दक्षिण गोव्यातील मडगाव येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

त्यांच्या ताब्यातून 17 लाख रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना पकडण्यासाठी किमान 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले, त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT