Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

Bhoma: 'भोममधील मंदिरांची हानी होणार नाही'! मंत्री नितीन गडकरींचे स्पष्टीकरण; लोकसभेत कॅ. विरियातोंनी विचारला प्रश्‍‍न

Nitin Gadkari Bhoma Road: महामार्गाचे विस्‍तारीकरण होताना भोममधील धार्मिक किंवा वारसा स्‍थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही’, असे मंत्री गडकरी यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या रुंदीकरणात भोममधील धार्मिक किंवा वारसास्‍थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी हमी केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे. दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता.

गोव्यातील फोंडा तालुक्यातील भोम गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा विस्‍तार प्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये दाखवण्‍यात आलेल्‍या संरेखनांनुसार होणार आहे का? या भागात धार्मिक आणि वारसा स्‍थळे असूनही केंद्र सरकारने विद्यमान संरेखन चालू ठेवले आहे का?

या मार्गाच्‍या विस्‍तारासाठी सरकारने खाजन जमिनींचा विचार केला होता का? असे प्रश्‍‍न खासदार फर्नांडिस यांनी विचारले होते. त्‍यावर उत्तर देताना, ‘गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग-७४८ या विस्‍तारात फोंडा तालुक्यातून जाणाऱ्या भागाचा समावेश होतो.

२०२१ च्या प्रादेशिक आराखड्यातील पर्यायांचा विचार करूनच विस्‍ताराच्‍या कामास मंजुरी देण्‍यात आली आहे. महामार्गाचे विस्‍तारीकरण होताना भोममधील धार्मिक किंवा वारसा स्‍थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही’, असे मंत्री गडकरी यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Bank: 21 वर्षांनंतर मोठा निकाल! 40 लाखांच्या कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सर्व 7 आरोपी निर्दोष; पोलिसांच्या ढिसाळ तपासावर न्यायालयाचे ताशेरे

Goa Mining: अठरापैकी सहा खाण लीज सुरू; सरकारला प्राथमिक टप्‍प्‍यात मिळाले सुमारे 400 कोटी

Ahmedabad Serial Blast Case: दहशतवाद्यांना अजिबात माफी नाही! 38 जणांना फाशी तर 11 जणांना जन्मठेप; अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

PM Narendra Modi Foreign Tour: "मुसाफिर हूं यारो..." मोदींच्या दौऱ्यांवर मिश्कील टोला

Viral Post: "हो, माझी गर्लफ्रेंड आहे, तिचं नाव...", वैभव सूर्यवंशी खरंच रिलेशनशिपमध्ये? पोस्ट होतेय व्हायरल, चाहते पडले संभ्रमात

SCROLL FOR NEXT