Bhoma Road: ‘नायलॉन-६६’ प्रकरणाची पुनरावृत्ती हवी आहे काय? चौपदरी रस्ताप्रश्‍नी भोमवासीयांचा सवाल

Bhoma Bypass: गावातून चौपदरी रस्ता बांधण्याचे त्वरित रद्द करून बगल मार्ग उभारा. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा ग्रामस्थांतर्फे संजय नाईक यांनी दिला.
Bhoma Road Flyover
Bhoma HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: ज्याप्रमाणे केरी-फोंडा येथील ‘नायलॉन-६६’ प्रकरणात जसे बळी गेले, तशीच अपेक्षा सरकारने बाळगली आहे काय, असे विचारून भोमवासीयांच्या भावना लक्षात घ्या आणि गावातून चौपदरी रस्ता बांधण्याचे त्वरित रद्द करून बगल मार्ग उभारा. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा ग्रामस्थांतर्फे संजय नाईक यांनी दिला.

भोमवासीयांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकार जबरदस्ती का करीत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या पत्रकार परिषदेला ग्रामस्थ उपस्थित होते. सरकारने भोम गावातून जबरदस्तीने चौपदरी महामार्ग करायचा प्रयत्न केला, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन, सरकारला बळीची अपेक्षा आहे काय, असा सवाल भोमवासीयांनी विचारला. भोम गावातून चौपदरी रस्ता नकोच, आम्हाला बगल मार्ग हवा, असा पुनरूच्चारही यावेळी करण्यात आला.

यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री कमलनाथ यांनी भोम येथून बगल मार्ग करण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, आता भाजप सरकार भोम गावाचे अस्तित्व नष्ट करून भर गावातून चौपदरी रस्ता बांधण्याच्या हट्टाला पेटले आहे. याप्रश्‍नी विरोधी नेत्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे, हे सहकार्य असेच रहावे, असे संजय नाईक म्हणाले.

भोम-हडकोण पंचायतीने गावातून चौपदरी रस्ता नकोच, असल्याचा एकमुखी ठराव घेतला आहे. त्यामुळे पंचायतीच्या माध्यमातून लोकांची भावना सरकारने लक्षात घ्यावी आणि हा प्रश्‍न सोडवावा, असे आवाहन भोमवासीयांनी केले.

Bhoma Road Flyover
Bhoma Road: ऐतिहासिक मंदिरांना हात लावू नका, रस्‍ता आराखड्यात बदल करा; भोम महामार्गाबाबत सरदेसाईंची मागणी

भाजपने निष्ठावंतांनाही डावलले

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून अनेक ठिकाणी लोकांना नको असलेली कामे सुरू आहेत. भाजप स्थापनेपासूनच्या कार्यकर्त्यांना डावलून आता पक्षात नव्याने शिरलेल्यांना भाजपचे नेते डोक्यावर घेऊन नाचत आहेत. मात्र, त्यांची जागा लोकच दाखवतील, असे भोमवासीय म्हणाले.

Bhoma Road Flyover
Bhoma Bypass: ...तर पंचायतीला टाळे ठोका! बगलमार्ग प्रश्‍नावरुन ग्रामसभा पेटली; संतप्त भोमवासीयांचा 'महामार्ग नको'चा पुनरुच्चार

माती परीक्षण सुरू

भोम गावातून चौपदरी रस्ता नेण्यासाठी सध्या सरकारच्या संबंधित खात्याकडून माती परीक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र, या कामाला भोमवासीयांचा तीव्र विरोध असून गाव नष्ट करून चौपदरी रस्ता न नेता बगल मार्ग उभारा, अशी जोरदार मागणी भोमकरांनी केली आहे. आम्हाला रस्ता कुठून कुठे नेणार आहे, किती जागा जाणार आहे ते आधी सांगा, असे भोमवासी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com