Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Bhoma Village: भोम-अडकोण गावाच्या माथ्यावर असलेल्या कुंडई औद्योगिक वसाहतीत सध्या बेकायदा मातीचा भराव टाकून जमीन समपातळीवर आणण्याचा प्रकार सुरू आहे. चौपदरी रस्ता विषयावरही गरमागरम चर्चा झाली.
Bhoma Panchayat
Kundaim industrial estateDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कुंडई औद्योगिक वसाहतीत असलेल्या दरीत मातीचा भराव टाकून बेकायदा जमीन समपातळीवर आणण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे गावाला धोका असल्याचा दावा करून ग्रामस्थांनी या मातीसह काळी भुकटी टाकून भराव टाकणाऱ्या आस्थापनावर त्वरित कारवाई करावी, अशी जोरदार मागणी भोम अडकोण पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत करण्‍यात आली. भोम चौपदरी रस्ता विषयावरही गरमागरम चर्चा झाली.

भोम अडकोण पंचायतीच्या उपसरपंच प्रियांका फडते गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला एकूण सहा पंचसदस्य उपस्थित होते. सुरुवातीला पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला त्यानंतर ग्रामसभेला सुरुवात झाली.

भोम-अडकोण गावाच्या माथ्यावर असलेल्या कुंडई औद्योगिक वसाहतीत सध्या बेकायदा मातीचा भराव टाकून जमीन समपातळीवर आणण्याचा प्रकार सुरू आहे.

कुंडई औद्योगिक वसाहतीतील धोकादायक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाजवळच हा मातीचा भराव टाकण्यात आला असून त्यात काळी भुकटी टाकली गेल्याने पावसाच्या नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत अडवला गेला आहे.

या मातीच्या भरावामुळे भोम गावाला धोका असून तेथील धोकादायक कचरा गावात येण्याची भीती व्यक्त करून पर्यावरणाला मारक ठरणारी ही कृती करण्यासाठी संबंधित आस्थापनाला कशी काय परवानगी मिळाली, असा सवाल ग्रामस्थांनी केला.

मातीसोबतच काळी भुकटी टाकली जात असल्याने नैसर्गिक जलस्रोतांवर विपरीत परिणाम होणार असून त्याची प्राथमिक सुरुवात झाली असल्याचे ग्रामस्थांनी पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले. या विषयावर गरमागरम चर्चा झाली पंचायतीने संबंधितांना त्वरित नोटीस पाठवून सरकारला कळवून हा मातीचा भराव टाकण्याचे काम त्वरित बंद पाडावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.

Bhoma Panchayat
Bhoma Road: ऐतिहासिक मंदिरांना हात लावू नका, रस्‍ता आराखड्यात बदल करा; भोम महामार्गाबाबत सरदेसाईंची मागणी

धोकादायक भुकटीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

कुंडई औद्योगिक वसाहतीत उंचावर असलेल्या दरीत मातीचा भराव टाकण्यात आला असून त्यावर आता काळी भुकटी टाकण्यात आली आहे. ही धोकादायक काळी भुकटी कोठून आली, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्‍थित केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या कृतीविषयी औद्योगिक वसाहत मंडळ तसेच सरकारला काहीच माहिती नाही काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला असून तीव्र नाराजी व्‍यक्त केली आहे.

Bhoma Panchayat
Bhoma Road: ‘नायलॉन-६६’ प्रकरणाची पुनरावृत्ती हवी आहे काय? चौपदरी रस्ताप्रश्‍नी भोमवासीयांचा सवाल

चौपदरी रस्त्याला ग्रामस्थांचा ठाम विरोध

भोम गावातील चौपदरी रस्त्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ग्रामसभेत चर्चेला आला. गावातून जाणाऱ्या चौपदरी रस्त्याला ग्रामस्थांचा ठाम विरोध असून सरकारने बगल मार्गाचा विचार करावा अशी मागणी केली. सरकारकडून पंचायतीला काय उत्तर मिळाले असे विचारले असता राष्ट्रीयमहामार्गासंबंधी सरकारकडून अजून कोणतेच स्पष्टीकरण आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर पंचायतीने मुख्यमंत्री तसेच इतर सर्व संबंधितांशी संपर्क साधून हा प्रश्‍न त्वरित निकाली काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. बाणस्तारी मार्केट संकुलात स्वस्त धान्याचे दुकान हलवण्यासंबंधीही आवश्‍यक ठराव घेण्यात आला. या ग्रामसभेत संजय नाईक तसेच इतरांनी प्रश्‍न उपस्थित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com