Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Amboli Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'! धोकादायक वळणावर ब्रेक निकामी, टेम्पो कोसळला 100 फूट खोल दरीत; चालक बचावला

Amboli Ghat Accident: नागपूरहून गोव्याला जाणारा आयशर टेम्पो रविवारी सकाळी आंबोली घाटातील नाना पाणी जवळच्या धोकादायक वळणावर दरीत कोसळला. चालक किरकोळ जखमी झाला.

Sameer Panditrao

सावंतवाडी: नागपूरहून गोव्याला जाणारा आयशर टेम्पो रविवारी सकाळी आंबोली घाटातील नाना पाणी जवळच्या धोकादायक वळणावर दरीत कोसळला. ब्रेक निकामी झाल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि टेम्पो तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत जाऊन उलटला. चालक किरकोळ जखमी झाला.

अधिक माहिती अशी की अपघाग्रस्त टेम्पो हा नागपूरहून गोव्यात जात होता. टेम्पोमध्ये पावडरचा माल भरला होता. सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. माळा कॉलनी, नागपूर) हा गाडी चालवत होता.

टेम्पो आंबोली घाटातील नाना पाणी जवळच्या धोकादायक वळणावर पोहाेचला असता गाडीचे ‘ब्रेक’ निकामी झाले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत जाऊन उलटला.

या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक सुमित हा किरकोळ जखमी झाला. प्रवीण राऊत, यश राऊत आणि इतर स्थानिकांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच कर्नाटक येथील पर्यटकांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT