Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Cuncolim Veroda railway accident: वेरोडा येथे शनिवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
Railway Accident
Railway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: वेरोडा येथे शनिवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कोकण रेल्वेच्या रूळावर बसलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा भीषण अपघातात मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वेरोडा येथील एक महिला शनिवारी मद्यप्राशन करून थेट कोकण रेल्वेच्या रूळावर जाऊन रेल्वे ट्रकवर बसली होती. दरम्यान, ही घटना एका स्थानिक नागरिकाच्या नजरेस पडली. त्याने तातडीने त्या महिलेच्या पतीला याबाबत माहिती दिली.

Railway Accident
Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

पत्नीच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्याने पतीने घटनास्थळी धाव घेतली. रूळावर बसलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी तो रेल्वे ट्रॅकवर पोहोचताच अचानक वेगाने धावणारी रेल्वे त्या ठिकाणी आली. यात पत्नीला वाचवण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि रेल्वेच्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

Railway Accident
Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com