Nagpur Madgaon Express Dainik Gomantak
गोवा

Nagpur Madgaon Express: विदर्भ ते थेट गोवा-कोकण रेल्वे प्रवास आता अधिक सोयीचा; नागपूर-मडगाव एक्स्प्रेसबाबत रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Nagpur Madgaon Bi Weekly Express Regularization: उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम सुरू असतानाच, विदर्भातून कोकण आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Sameer Amunekar

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम सुरू असतानाच, विदर्भातून कोकण आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विशेष गाडी (Special Train) म्हणून धावणाऱ्या नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचे रेल्वे प्रशासनाकडून अखेर नियमितीकरण करण्यात आले आहे.

या महत्त्वाच्या निर्णयामुळे विदर्भ आणि कोकण-गोवा रेल्वे संपर्काला मोठी गती मिळणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि सातत्यपूर्ण मागणीचा विचार करून रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि खात्रीशीर होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा

शनिवारी नागपूर रेल्वे स्थानकावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवून तिच्या नियमित सेवेचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष रेल्वेचे रूपांतर आता नियमित गाडीत झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

कोकण रेल्वेच्या निसर्गरम्य मार्गावरून प्रवास करण्याचा आनंद

ही नागपूर-मडगाव एक्स्प्रेस विदर्भातून निघून थेट निसर्गरम्य कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोकणातील हिरव्यागार दऱ्या, नयनरम्य घाट, लांबच लांब बोगदे आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या विहंगम दृश्यांचा आनंद लुटता येणार आहे. निसर्गाचा हा सुंदर नजराणा पर्यटकांसाठी आणि सुट्ट्यांमध्ये सहलीचे नियोजन करणाऱ्या कुटुंबांसाठी एक मुख्य आकर्षण ठरणार आहे.

'या' महत्त्वाच्या स्थानकांवर मिळणार थांबा

प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाडीला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड आणि करमाळी या प्रमुख स्टेशनचा समावेश आहे.

सर्वच वर्गातील प्रवाशांना फायदा: थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे केवळ पर्यटकांनाच नव्हे, तर विदर्भातून मुंबई-कोकण परिसरात शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी, व्यावसायिक, चाकरमानी आणि रुग्णांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. वेगवेगळ्या राज्यांना जोडणारा हा रेल्वेमार्ग येत्या काळात प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT