Goa Drowning Case Dainik Gomantak
गोवा

South Goa: सकाळीच तो खोलीतून गायब झाला, शोध घेता मृतदेह मिळाला; नागपूरच्या युवकाचा गोव्यात समुद्रात बुडून मृत्यू

Nagpur Youth Drowned At South Goa Beach: प्रणय पुण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होता, त्यामुळे पुण्यातच तो वास्तव्यास होता.

Pramod Yadav

मडगाव: बहीण आणि भावोजींसोबत गोव्याला फिरायला गेलेल्या नागपूरच्या युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. दक्षिण गोव्यातील एका बीचवर शुक्रवारी (१३ डिसेंबर) सकाळी ही घटना घडली. मूळ नागपूरचा असणारा युवक पुण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होता. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केलीय.

प्रणय विजय थूल (वय ३३, रा. भगवाननगर, न्यू इंदिरा कॉलनी) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रणयच्या पार्थिवावर शनिवारी (१४ डिसेंबर) मानेवाडा येथे अंत्यसंकार केले जाणार आहेत. प्रणय पुण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होता, त्यामुळे पुण्यातच तो वास्तव्यास होता. गुरुवारी तो बहीण आणि दाजींसोबत गोव्यात पर्यटनासाठी आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय बहीण आणि दाजींसोबत गुरुवारी रात्री दक्षिण गोव्यात आला. येथेच एका समुद्र किनाऱ्यावरील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. शुक्रवारी प्रणय त्याच्या खोलीत आढळून न आल्याने त्याचा इतरत्र शोध घेण्यात आला. कुठेच मिळत नसल्याने अखेर समुद्र किनारी त्याचा शोध घेतला असता समुद्रात प्रणयचा तरंगता मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी मृत्यूची नोंद करून मृतदेह गोवा वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. प्रणय विजय थूल याच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, KL राहुल नाही; आशिया कपबाबत मोठी बातमी, माजी खेळाडूने केला खुलासा

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: 'गोविंदा रे गोपाळा..!'. डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

SCROLL FOR NEXT