Arrest Canva
गोवा

Goa Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिघांना 20 वर्षांची शिक्षा; बाल न्यायालयाचा निवाडा

Canacona Crime: हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील असून कामानिमित्त ते अनेक वर्षांपासून गोव्यात आहे. त्याच ठिकाणी ते झोपड्यांमध्ये राहात होते.

Sameer Panditrao

Nagarse Canacona Crime News

पणजी: नगर्से - काणकोण येथे निर्माणाधीन इमारतीच्या ठिकाणी राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने रवी रई, जयदीप रई, मनोज कुमार यांना तीन वेगवेगळ्या आरोपांखाली प्रत्येकी २० वर्षांची कैदेची शिक्षा सुनावली, तसेच ७.५० लाखांचा दंड ठोठावला आहे.

या तिघांना न्यायालयाने भादंसंच्या कलम ३७६ खाली २० वर्षे कैद तसेच ५ लाख रुपये दंड, बाल कायद्याच्या कलम ८ (२) खाली २० वर्षे कैद व २ लाखांचा दंड तसेच पोक्सो कायद्याखाली २० वर्षे कैद व २ लाखांचा दंड ठोठावला आहे. भादंसंच्या कलम ३६५ खाली आरोपी रवी रई आणि जयदीप रई यांना ७ वर्षे कैद व ५० हजार रुपये दंड ठोठावताना संशयित मनोज कुमार याला निर्दोष ठरविले आहे.

या प्रकरणाचा तपास करताना पीडित मुलीची तसेच आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ठोस पुरावे जमा करून बाल न्यायालयात या तिघांविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाचा तपास तत्कालीन काणकोण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशल देसाई यांनी केला होता.

पीडित मुलीचे वडील हे नगर्से - काणकोण येथील निर्माणाधीन इमारतीच्या ठिकाणी कामाला होते. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील असून कामानिमित्त ते अनेक वर्षांपासून गोव्यात आहे. त्याच ठिकाणी ते झोपड्यांमध्ये राहात होते.

घटनेच्या तीन महिन्यांआधी या मुलीच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे या झोपडीमध्ये ती आणि तिचे वडील राहात होते. याच बांधकामाच्या ठिकाणी आरोपी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते.

एके दिवशी पीडित मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार भावाकडे केली असता, त्याने ही माहिती वडिलांना सांगितली. विचारपूस केली असता तिने आरोपींकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे वडिलांनी काणकोण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

बिगर सरकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुलीची जबानी पोलिसांनी नोंदवली. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपींविरुद्ध बलात्कार, अपहरण तसेच लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले होते. सुनावणीवेळी साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीच्या आधारावर या तिघांनाही दोषी ठरविण्यात आले.

मुलीचे वडील कामाला गेल्यावर शाळेत जाणारी ही मुलगी एकटीच झोपडीत असायची. त्याचा गैरफायदा घेऊन हे आरोपी तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरून निर्जनस्थळी घेऊन जात होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. काणकोण पोलिसांनी एप्रिल २०१८ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबानीत तिघा आरोपींची नावे घेतली होती. त्यानुसार त्या तिघांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT