Sao Joao De Areal, South Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: मुस्लिम व्यक्तीची जमीन, छत्रपतींचा पुतळा, कॅथलिकांचा विरोध & फळदेसाईंवर हल्ला; शिवजयंतीला दक्षिण गोव्यात काय घडलं?

सां जुझे दी अरीयाल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्धाटनानंतर फळदेसाई माघारी जात असताना पुतळ्याची उभारणी अवैध असल्याचे म्हणत जमावाने त्यांना घेरले.

Pramod Yadav

Sao Joao De Areal, South Goa

दक्षिण गोवा सासष्टीतील सां जुझे दी अरीयाल येथे आज (सोमवार) शिवजयंतीच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद झाला.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते दुपारी या अश्वारुढ पुतळ्याचे उद्धाटन झाले. उद्धाटनानंतर फळदेसाई माघारी जात असताना पुतळ्याची उभारणी अवैध असल्याचे म्हणत जमावाने त्यांना घेराव घातला. वादानंतर मंत्री जात असताना त्यांच्यावर माती फेकण्यात आली.

जमावाने घातलेल्या गोंधळानंतर मंत्री फळदेसाई माघारी जात असताना त्यांच्यावर माती फेकण्यात आली. यात मंत्री फळदेसाई आणि त्यांच्या टीममधील काही जणांना किरकोळ जखम झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेली जमीन खासगी असून, ती मुस्लिम व्यक्तीची आहे. व्यक्तीने जमिनीत पुतळा हिंदू नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास आणि कॅथलिक समाजाला क्रॉस उभारण्यास परवानगी दिली.

पुतळा उभारण्यासाठी इतर आवश्यक परवानगीची माहिती घेतली असता, जागा खासगी असल्याने त्याची आवश्यकता नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे संबधित ठिकाणी पुतळा उभारून शिवजयंतीचे औचित्य साधून त्याचे आनावरण करण्यात आले, असे स्थानिकांनी सांगितले.

सां जुझे दी अरीयालच्या स्थानिकांनी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी बेकायदेशीर असल्याचे म्हणत पुतळा हटविण्याची मागणी केली आहे. पुतळा उभारण्यासाठी पंचायतीची परवानगी घेतली नाही, तसेच दमदाटी करुन जागेवर अतिक्रमण करत पुतळा उभारल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी यात लक्ष घालावे तसेच, अवैध पद्धतीने उभारण्यात आलेला पुतळा हटविण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सां जुझे दी अरीयाल येथे पुतळा उभारण्यास काही जणांनी विरोध केला होता. गावात क्रॉस आहेत, आम्ही छत्रपतींवरील गीते आणि घोषणा चालू देणार नाही, अशी भूमिका काही स्थानिकांनी घेतली होती. भाजप नेते सावियो रॉड्रिग्स यांनी मध्यस्थी करत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यानंतर देखील तणाव कायम राहिला होता.

दरम्यान, सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात केला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT