Goa Cricket Association Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Association: सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटला नमवत मुष्टिफंड हायस्कूलकडे जेतेपद

अंतिम सामना शनिवारी कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Goa Cricket Association अटीतटीच्या लढतीत कुजिरा येथील मुष्टिफंड हायस्कूलने वास्कोच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटला चार धावांनी नमवून गोवा क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील मुलांच्या अध्यक्षीय करंडक शालेय क्रिकेट स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले. अंतिम सामना शनिवारी कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

मध्यफळीतील नवीन कुमार याच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर मुष्टिफंड हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना 123 धावा केल्या. नवीन याने 74 चेंडूंतील खेळीत 12 चौकारांच्या मदतीने 65 धावा नोंदविल्या.

नंतर शौर्य चोडणकर (3-16) व अथर्व देशभंडारी (3-34) या मुष्टिफंड हायस्कूलच्या गोलंदाजांनी सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटचा डाव 119 धावांत गुंडाळण्यास मोलाचा वाटा उचलला.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके, संयुक्त सचिव रुपेश नाईक, जीसीए स्वीकृत सदस्य आदित्य चोडणकर, जीसीए ज्युनियर क्रिकेट संचालक प्रशांत काकोडे, जीसीए उत्तर गोवा स्पर्धा समन्वयक सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

संक्षिप्त धावफलक

मुष्टिफंड हायस्कूल: ३६ षटकांत सर्वबाद १२३ (प्रमय प्रभू १२, शौर्य चोडणकर १३, नवीन कुमार नाबाद ६५, प्रणव २-१७, मंगेश २-२९, सर्वांभ नाईक ४-३२) विजयी विरुद्ध

सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट: 35.5 षटकांत सर्वबाद 119 (युवराज दाभोळकर 34, सर्वांभ नाईक 39, विकी आखाडे 14, शौर्य चोडणकर 3-16, अथर्व देशभंडारी 3-34).

वैयक्तिक बक्षिसे: स्पर्धेचा मानकरी: सर्वांभ नाईक (सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट), अंतिम सामन्याचा मानकरी: नवीन कुमार (मुष्टिफंड हायस्कूल).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: जपान आणि अमेरिकेच्या काही भागात स्थलांतराचा इशारा

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

Goa Crime: धमकी, खून - अत्याचाराचा प्रयत्न! आरोपीला 10 वर्षांचा कारावास; फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निवाडा

Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण नकोच! निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरणार'; स्थानिक आक्रमक

SCROLL FOR NEXT