Ramesh Tawadkar : त्यांचा 'हप्ता' बंद झाल्यानेच माझ्यावर आरोप; अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार- तवडकर

लाकडांचा व्यवहार कायदेशीर व गोरगरीबांना घरे बांधन देण्यासाठीच
Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Ramesh Tawadkar :  काणकोणातील वृक्षतोड प्रकरणी सभापती रमेश तवडकर यांच्या विरोधात दक्षिण गोवा वनपालाकडे तक्रार केलेल्या कॉंग्रेसचे नेते जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्डचे नेते विकास भगत यांच्यावर अब्रुनुकसनाची खटला दाखल करणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. 

Ramesh Tawadkar
Liquor Seized in Goa: अवैधरित्या दारु वाहतूक प्रकरणी एकाला अटक, कुळे पोलिसांची कारवाई

"काणकोणमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जुगार चालू आहेत त्यांत जनार्दन भंडारी व त्यांच्या साथीदारांचा हात आहे. तसेच शॅकवाले व लहान लहान दुकानदारांकडुनही हप्ते घेण्याच्या प्रकरणात त्यांचा हात आहे.

या संदर्भात आपल्याकडे अनेक तक्रारी आल्याने,  ही सर्व बेकायदेशीर कामे आपण बंद केली व त्याचे दैनंदीन जगण्याचे साधनच बंद झाले आहे त्यामुळे त्यांनी आपल्यावर नाहक आरोप करण्याचे सत्र आरंभिले आहे" अशी तोफही सभापती तवडकर यांनी डागली. 

"जर भंडारी हे खरोखरच दुःखी पिडीत झाले असतील तर त्यांचे पुनर्वसन करण्यास आपण तयार आहे. मात्र त्यानी आपले नाव बदनाम करु नये", असेही सभापती तवडकर म्हणाले. 

Ramesh Tawadkar
Goa Drugs Cartel: रशियाच्या ऑलिम्पिक पदक विजेतीने गोव्यात असं तयार केलं होतं जाळं

जे वृक्ष तोडलेले आहेत ते केवळ वादळ वाऱ्याने खाली पडलेले होते. त्यांचा रितसर लिलाव करुन, शुल्क भरुन व कायदेशीर रित्या परवानगी घेऊनच नेण्यात आली आहेत.  शिवाय हे सागवानचे नसुन जांभळ, किनळ व  निलगिरी झाडांचे लाकूड आहे.

ज्या सरकारी वखारीत ही लाकडे चिरली गेली तिथे सागवानचे किंवा इतर प्रकारची लाकडे होती ती आपली नाहीत. पण भंडारी व भगत यानी ही सुद्धा झाडे आपली असल्याचे भासविले.

ही जी लाकडे आहेत ती केवळ श्रमधाम योजनेच्या तीन घरांसाठीच असून या लाकडाची किंमत 38500 रुपये आहे. अशी कृत्य करून पक्षाच्या श्रमधाम कार्याला खीळ बसविण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न फसला आहे असेही तवडकर यानी सांगितले. 

व्यवस्थित चौकशी न करता सभापती पदावर असलेल्या व्यक्तीला विरप्पन संबोधणे, लोकांची दिशाभूल करणे या प्रकारांविरोधात आपण जनार्दन भंडारी व विकास भगत यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

येत्या एक दोन दिवसाच वकिलाशी बोलून हा खटला न्यायालयात दर्ज केला जाईल असेही तवडकर यानी सांगितले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com