Mormugao News Dainik Gomantak
गोवा

Mormugao News: रेल्वे प्रशासनाला 'ते' काम थांबवण्याचे पालिकेचे आदेश

वास्कोत मायमोळे येथे कब्रस्तान जवळ रेल्वे दुपदरीकरणाचे काम चालू असताना अनेक आडकाठी निर्माण झाल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao News मुरगाव पालिकेने रेल्वेला मायमोळे तळ्याजवळ विस्ताराचे काम थांबवण्याचे निर्देश दिले आहे. पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून पालिकेने रेल्वेला पावसाच्या पाण्याला योग्य मार्ग उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही दिले आहेत.

वास्कोत मायमोळे येथे कब्रस्तान जवळ रेल्वे दुपदरीकरणाचे काम चालू असताना अनेक आडकाठी निर्माण झाल्या आहेत. गेल्या दोन तीन महिन्या अगोदर याठिकाणी काम चालू असताना कब्रस्तान मधील थडग्यावर मोठे दगड कोसळून थडग्यांचे नुकसान झाले होते.

यानंतर मुस्लिम बांधवांनी गदारोळ माजवून सदर कामाला विरोध दर्शवला होता. नंतर वास्कोचे आमदार दाजी साळकर, मंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी रेल्वे अधिकारी, मुस्लिम जमात यांची एकत्रित बैठक बोलावून समझोता घडवून आणला होता. यावेळी रेल्वेने कब्रस्तान मधील थडग्यांना कोणत्याच प्रकारची हानी होणार नसल्याची ग्वाही दिली होती.

दरम्यान काम चालू असलेल्या ठिकाणी मायमोळे तळे व रेल्वे मार्गाखाली एक मोठा नाला असून या नाल्यातून बायणा, मांगोरहील ड्रायवरहिल, मेस्तवाडा आदी भागातील पाणी वाहून सरळ शिपयार्ड जवळील नाल्यातून जाऊन दर्याला मिळते.

रेल्वे दुपदरीकरणाचे काम चालू असून संरक्षक भिंतीचे काम सध्या चालू आहे. संरक्षक भिंतीचे काम नाल्याजवळ चालू असून सदर नाल्याचे तोंड कमी होत गेल्याचे काहींच्या निदर्शनास आले असता याची माहीती पालिका नगराध्यक्षांना दिली असता त्यांनी मायमोळे कब्रस्तान जवळ सदर कामाच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली असता, या कामामुळे पावसाळ्यात मायमोळे भागात व इतर भागात पुरस्थिती उद्भवू नये म्हणून रेल्वेला या भागात रेल्वे विस्ताराचे काम थांबवण्याचे निर्देश देण्यात आले.

आता पावसाळा जवळ आला असून हे काम चालू राहिल्यास या नात्यातून पाणी वाहून जाण्याची वाट बंद होणार व त्यामुळे मायमोळे भागातील लोकांना पावसाळ्यात पुरस्थितीचा सामना करावा लागेल.

लोकांच्या घरा दारात पाणी घुसेल व लोकांना याचा त्रास सहन करावा लागेल. पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून पालिकेने रेल्वेला मायमोळे तळ्याजवळ पुलाच्या विस्ताराचे काम थांबवण्याचे निर्देश दिले.

तसेच पावसाळ्यात मायमाेळे व इतर भागात पूर येऊ नये म्हणून पालिकेने रेल्वेला पावसाच्या पाण्याला योग्य मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. पाहणीवेळी नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगीस, नगरसेवक गिरीष बोरकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT