Mungul Gangwar Dainik Gomantak
गोवा

Mungul Gangwar: मुंगूल गँगवॉरप्रकरणी अमोघ नाईकला सशर्त जामीन मंजूर, इतरांच्या जामिनावर सोमवारी निवाडा

Mungul Gangwar Update: मुंगूल गँगवॉरप्रकरणी अमोघ नाईक याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मुंगूल गँगवॉरप्रकरणी अमोघ नाईक याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला तर अन्य दहाजणांच्या जामिनावर सोमवार, २९ डिसेंबर रोजी निवाडा होणार आहे.

या गॅंगवॉरप्रकरणी आतापर्यंत सोळाजणांना जामीन मंजूर झाला आहे. अमोघ याला ५० हजारांचा वैयक्तिक बॉण्ड व तितक्याच रकमेचे दोन स्थानिक हमीदार, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाणे, पुरावे नष्ट न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे व अन्य अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

अमोघ नाईकसह आणखी १० संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मागच्या आठवड्यात न्यायालयाने व्हॅली डिकॉस्टा, अमर कुलाल, वासू कुमार, मोहन अली, ज्योयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा, अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार, अक्षय तलवार या तेरा जणांना सशर्त जामीन मंजूर केला होता. तसेच दीपक कट्टीमणी व परशुराम राठोड या दोघांना पूर्वीच जामीन मंजूर झाला होता.

संघर्षातून टोळीयुद्ध : मुंगूल येथे १२ ऑगस्टला गँगवॉरची घटना घडली होती. एकूण २८ जणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. त्यातील व्हॅली व वॉल्टर यांच्या गँगच्या संघर्षातून हे टोळीयुद्ध झाले होते.

यात युवकेश सिंग व रफिक तैशान हे दोघे गंभीर जखमी झाले होते. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा या  गँगवॉर प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात आढळून आल्याने, या घटनेचे गूढ वाढले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NRI Property Rights India: परदेशात राहणाऱ्या मुलींना भारतात वडिलांची शेतजमीन वारसाहक्काने मिळते का? वाचा काय सांगतो कायदा

GST Reforms From 1 November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार GST चे नियम! नोंदणी होणार सोपी, रिफंड मिळणार फास्ट; मोदी सरकारची व्यापाऱ्यांना दिवाळी भेट

Bomb Threat News: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT