Assault Case Goa Dainik Gomantak
गोवा

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Mungul Firing Case 7 Arrested:: मागचा काही काळ मडगाव परिसर गॅंगवारपासून मुक्त होता. मात्र, आज (12 ऑगस्ट) पहाटे पुन्हा एकदा मडगावात गॅंगवॉरचा उद्रेक झाला.

Manish Jadhav

मडगाव: मागचा काही काळ मडगाव परिसर गॅंगवारपासून मुक्त होता. मात्र, आज (12 ऑगस्ट) पहाटे पुन्हा एकदा मडगावात गॅंगवॉरचा उद्रेक झाला. पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास गाडीतून जाणाऱ्या दोन युवकांचा अन्य चार जणांनी पाठलाग करुन मुंगूल येथे अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना मुंगुल (मडगाव) परिसरात घडली. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी आता पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकल्या.

दरम्यान, या प्रकरणात रफिक तशान (24) आणि युवकेश तशान (20) हे दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना 'गोमेकॉत हलविण्यात आले. या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी पाच जणांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. जखमी रफिक आणि युवकेश हे दोघेही वॉल्टर गॅंगशी संबंधित असून पूर्वाश्रमीच्या भांडणांतून हा हल्ला केल्याचे सांगितले जात असून या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी अक्षय तलवार, राहुल तलवार (दोघेही बडे-मडगाव), विल्सन कार्व्हालो, शाहरुख (दवली) आणि रसूल या पाच जणांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. याशिवाय, आणखी सुमारे 15 अज्ञात संशयितांच्या विरोधात खुनी हल्ला केल्याचा गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्यांनी तोंडावर बुरखा घातला होता. त्यांनी रफीक आणि युवकेशवर सोडा बॉटल आणि कोयत्याने हल्ला चढवला, यातील एका बुरखाधारी संशयिताने दोनदा गोळीबार केला. मात्र, या गोळ्या गाडीच्या काचेला लागून काच फुटली. त्यानंतर हल्ला करणारे घटनास्थळाहून पळून गेले. मुंगूल-फातोर्डा येथील शगून रेस्टॉरंटजवळ हे टोळीयुद्ध भडकले. त्यात रफीक आणि युवकेशच्या गाडीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दुसरीकडे, हा हल्ला नेमका कुठल्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून दोन गुन्हेगारी गॅंगमधील हा आप आपसातील वाद असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma: क्रिकेट फॅन्ससाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी 'मुंबईच्या राजा'ची शिवाजी पार्कवर 'पॉवर हिटिंग' Watch Video

Sawantwadi Crime: 'ती' आत्महत्या कौटुंबिक कारणामुळेच? मोती तलावात उडी घेणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह 17 तासांनी सापडला

Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले; व्हेनेझुएलाच्या मारिया मचादो यांना मिळाला नोबेल शांतता पुरस्कार

Yashasvi Jaiswal Century: शतक पूर्ण... सेलिब्रेशन व्हायरल! यशस्वी जयस्वालने 'ती' फ्लायिंग किस कोणासाठी दिली? Watch Video

IPL Auction: काऊंटडाऊन सुरु! आयपीएल 2026 लिलावाची तारीख ठरली! रिटेन्शनची डेडलाईनही जाहीर

SCROLL FOR NEXT