Goa Fire Case: म्हापसा पेडे येथे घराला आग; 5-6 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

Goa Fire Case: गोव्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी आगीच्या घटना; वाढती आगीची चिंता
Goa Fire Case
Goa Fire CaseDainik Gomantak

Goa Fire Case: गोव्यात शुक्रवारी दुपारपर्यंत आगीच्या दोन घटना घडल्या. शापोरा मार्केटजवळ झोपडीला आग लागल्याचा प्रकार समोर आला असून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुकेल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

तर दुसरी घटना म्हापसाजवळच्या रुक्मिणी प्लाझा, पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये घडली असून या आगीत मिया खतीब यांच्या मालकीचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले.

दुपारी 12:15 च्या सुमारास मिया खतीब यांच्या रुक्मिणी प्लाझा मधील घराला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दल आणि पोलिस पथकांने घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र या आगीत रोख रक्कम आणि कायदेशीर कागदपत्रांसह घराचे संपूर्ण छत जळून खाक झाले. लागलेल्या आगीत सुमारे 5 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Goa Fire Case
Jharkhand: गोव्याला जाऊ दिले नाही म्हणून कॉलेज तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

धक्कादायक म्हणजे ही घटना घडली तेव्हा खतीब कुटुंब पणजी येथे न्यायालयीन सुनावणीसाठी गेले असल्याचे समजतेय. ही आग कशी लागली याबाबत सविस्तर तपशील अद्याप प्राप्त होऊ शकला नाही.

सध्या गोव्यात आगीच्या घटना घडत असून गेल्या 15 दिवसांत जवळपास 5 ते 6 घटना घडल्याचे समोर आलेय. काही दिवसांपूर्वी मडगांव आके येथील सिने विशांतच्या बाजूला असलेल्या इमारतीमधील पारस फार्मसीलाआग लागली होती.

या आगीत हजारोंची हानी झाली होती. तर त्या आधी लोयोला हायस्कूलच्या मागे सज्जन नाईक यांच्या मालकीचे सेलिब्रेशन गिफ्ट कम स्टेशनरी शॉप नावाचे दुकान आहे.

या दुकानात असलेले मौल्यवान गिफ्ट वस्तू, स्टेशनरी, कॉम्पुटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर सहित इतर वस्तू या आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या.

होळी आणि शिगमोत्सवाच्या दरम्यान गोव्यात जंगल, काजू बागायती आणि माळरानावर आगी लागण्याचे दुर्दैवी प्रकार हल्ली गोव्यात घडू लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com