Bethora Firing Case: बेतोडा गोळीबार प्रकरण अपडेट! जखमी सचिन कुर्टीकरविरुद्ध बेकायदेशीर अंमलीपदार्थ बाळगल्याचा गुन्हा नोंद

Bethora Firing Case: तपासकाम करताना फोंडा पोलिसांना त्याच्या दुचाकीच्या डिकीमध्ये 10 ग्रॅम गांजा सापडला होता.
Bethora Firing Case
Bethora Firing CaseDainik Gomantak

Bethora Firing Case: बेतोडा येथे शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या गोळीबार प्रकरणातुन आत्ता पर्यंत नवनवीन अपडेट समोर येत आहेत.

काल म्हणजेच शनिवारी पोलिसांनी गोळीबार प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी घटनेवेळी वापरलेले पिस्तूल आर्ल-केरी येथून केले हस्तगत केले आहे.

विशेष म्हणजे सचिन कुर्टीकरला मारण्याचा कट जानेवारीत शिजला होता अशी माहितीही चॊकशीदरम्यान समोर आली आहे.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीद्वारे असे समजतेय की या गोळीबार प्रकरणात जखमी होऊन गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत असलेल्या सचिन कुर्टीकर याच्याविरुद्ध बेकायदेशीर अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तपासकाम करताना फोंडा पोलिसांना त्याच्या दुचाकीच्या डिकीमध्ये 10 ग्रॅम गांजा सापडला होता. या प्रकरणात अमली पदार्थासह अनैतिक संबधाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फोंडा पोलिसांनी गोळीबारप्रकरणी तीन संशयितांना अटक केली असून यापैकी एकजण फोंडा येथील रहिवासी असून, दोनजण मूळ बिहारचे रहिवासी आहेत. गोळीबारानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते.

मात्र पोलिसांच्या जलदगतीच्या तपास पद्धतीमुळे अवघ्या 24 तासांच्या आत संशयित आरोपींना गुन्हकारण्यासाठी वापरण्यात आलेल्या हत्यारासहित (पिस्तूल) पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलंय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com