Court Dainik Gomantak
गोवा

Kavale Math Conflict: कवळे मठाच्या स्वामींवर अटकेची टांगती तलवार; कथित मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Mumbai High Court Goa Bench: शिवानंद सरस्वती स्वामींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (26 फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Hearing on Shivananand Saraswati’s Petition in Kavale Math Property Case on Feb 26

पणजी: कवळे मठाच्या कथित मालमत्तेच्या गैरव्यवहारप्रकरणी फोंडा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी शिवानंद सरस्वती स्वामींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (26 फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे. या याचिकेला विरोध करण्यासाठी फोंडा पोलिस प्रतिज्ञापत्राद्वारे आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.

मागील सुनावणीवेळी पोलिसांकडून कारवाई किंवा अटक केली जाऊ नये यासाठी अंतरिम निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकादारने केली होती ती खंडपीठाने फेटाळली होती. प्रतिवादी भूषण जॅक व डॉ. पी. एस. रामाणी यांनाही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यावर ते सुद्धा उत्तर दाखल करण्याची शक्यता आहे. फोंडा (Ponda) पोलिसांनी शिवानंद सरस्वती स्वामींविरोधात चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होण्‍याची किंवा त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संरक्षण मिळण्यासाठी ही याचिका सादर करण्यात आली आहे.

शिवानंद सरस्‍वती स्वामी यांनी जमीनविक्रीसंदर्भात केलेला व्यवहार दिवाणी स्वरूपाचा असताना फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे प्रकरण कवळे मठाअंतर्गत असल्याने फोंडा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा. या प्रकरणावर पडदा पडलेला आहे व जो जमीनविक्रीचा व्यवहार केला आहे, तो रद्द केला आहे. हे प्रकरण सहा वर्षांपूर्वीचे आहे. जाणूनबुजून ही तक्रार दाखल करून स्वामींना बदनाम करण्यासाठी हा खटाटोप काही अनुयायांनी केला आहे. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा त्वरित विक्रीखत रद्द केले. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले आहे.

काही अनुयायांकडून ‘राजकारण’

देवस्थानच्याच काही अनुयायांकडून राजकारण (Politics) केले जात आहे असा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी भारतीय दंड विधान ४२०, ४१९ अन्‍वये तोतयेगिरी व फसवणूक, ४६५ अन्‍वये खोटारडेपणा आदी गुन्‍हे नोंद केला असून काही दस्तावेज जमा करण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT