High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

हायकोर्टाचा 'बार कौन्सिल'ला अल्टिमेटम! वकील गैरवर्तणूक तक्रारीचा निकाल 17 मे पर्यंत लावा; मुन्नालाल हलवाई यांना मिळणार न्याय

Mumbai High Court Order On Munnalal Halwai Petition: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ला एका वकिलांविरुद्धच्या गैरवर्तणुकीच्या तक्रारीचा निकाल १७ मे २०२६ पर्यंत देण्याचे निर्देश दिले.

Manish Jadhav

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ला एका वकिलांविरुद्धच्या गैरवर्तणुकीच्या तक्रारीचा निकाल १७ मे २०२६ पर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत. मुन्नालाल हलवाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे यापूर्वीचे आदेश असतानाही याचिकाकर्त्याची तक्रार अद्याप प्रलंबित असल्याचेदेखील न्यायालयाच्या निरीक्षणात आले.

९ ऑक्टोबर २०२२ रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर समितीची पुनर्रचना करून नव्या समितीने ११ सप्टेंबर २०२५ रोजी सुनावणी पूर्ण केली. सुनावणी पूर्ण होऊनही अद्याप कोणताही अंतिम आदेश देण्यात आलेला नाही. सातत्याने होत असलेल्या या विलंबाबद्दल खंडपीठाने तीव्र चिंता व्यक्त केली. यावर बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वकिलांनी न्यायालयात ग्वाही दिली की, सध्याची समिती १७ मे २०२६ पर्यंत या तक्रारीवर अंतिम निर्णय घेईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जून २०२६ रोजी निश्चित केली आहे.

२९ सप्टेंबर २०२२ रोजी उच्च न्यायालयाने याच याचिकेवर सुनावणी करताना ‘बार कौन्सिल’ला एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यापूर्वी, १७ डिसेंबर २०२१ रोजी ‘के. अंजीनाप्पा विरुद्ध के. सी. कृष्ण रेड्डी’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील प्रलंबित तक्रारी एका वर्षाच्या आत निकाली काढण्याचे निर्देश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT