Mumbai Goa Vande Bharat Train Interior Video Dainik Gomantak
गोवा

सेन्सरचे दरवाजे, एलईडी लाईट, 360 अंशात फिरणारी सीट; कसे आहे मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचे इंटेरिअर? Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबईसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

Pramod Yadav

Mumbai Goa Vande Bharat Train Interior Video: बहुप्रतिक्षित गोवा-मुंबई सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे 3 जून रोजी नियोजित उद्धाटन ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे पुढे ढकलण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, 05 जूनपासून ट्रेनची नियमित सेवा सुरू होणार होती.

दरम्यान, आता वंदे भारत ट्रेनची अधिकृत तारीख समोर आली असून, 27 जूनपासून वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबईसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

कसे आहे मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचे इंटेरिअर?

मुंबई - गोवा वंदे भारत ट्रेनचे इंटेरिअर दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ट्रेन 120 किमी प्रतितास वेगाने धावत, 586 किमी अंतर आठ तासांत पूर्ण करेल. वंदे भारत ट्रेन या प्रवासात 11 स्थानकांवर थांबे घेईल.

ट्रेनमध्ये 2 बाय 2 सीट अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक सीटजवळ चार्जिंगसाठी व्यवस्था करण्यात आलीय. ट्रेनला आठ डब्बे असून यात 360 अंशात फिरणाऱ्या सीटचा डब्बा (विस्टा डोम) याचा देखील समावेश आहे. ट्रेनमध्ये स्वंयचलित दरवाजे आहेत.

अतिशय स्वच्छ आणि आधुनिक स्वच्छतागृह असून, त्याचा दरवाजा देखील हाताच्या सेन्सरने उघडतो. ट्रेनमध्ये एलईडी लाईटची सुविधा असून, त्यामुळे आतील वातावरण देखील प्रसन्न वाटत आहे.

येथे पाहा वंदे भारत ट्रेनचे इंटेरिअर दाखवणारा व्हिडिओ

संभाव्य वेळापत्रक

मुंबईहून सकाळी ५.२५ वाजता सुटेल.

मडगाव स्थानकावर दुपारी १.१५ वा. पोहोचेल.

मडगावहून दुपारी २.३५ वाजता सुटेल.

मुंबईत ‘सीएसटी’वर रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.

(गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल.)

प्रमुख थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी. 

तिकिट दर?

मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांचा आवाक्याच्या बाहेरचे आहेत. या गाडीचे चेअर कारचे तिकीट 1580 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट 2870 रुपये आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार यात बदल होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT