Goa-Mumbai Vande Bharat Train: गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट किती? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर...

आठवड्यातून 6 दिवस धावणार
Goa-Mumbai Vande Bharat Express
Goa-Mumbai Vande Bharat ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Mumbai Vande Bharat: गोव्यातील पहिल्याच मडगाव-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या दोन ठिकाणांदरम्यान धावणारी ही पहिलीच हायस्पीड ट्रेन आहे.

शनिवार (ता. 3 जून) पासून धावणार आहे. या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत.

उद्घाटनानंतर 5 जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Goa-Mumbai Vande Bharat Express
Goa Congress: स्मार्ट सिटी कामाच्या घोटाळ्यात मुख्यमंत्री, मुख्य सचिव, आयुक्त दोषी... काँग्रेसचा आरोप

ट्रेनची वेळ

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी 5.35 वाजता ट्रेन सुटेल. ठाणे 6.05, नवेल 6.40, खेड 8.40, रत्नागिरी 10.00 तर मडगावात दुपारी 1.25 वाजता ही ट्रेन पोहचेल.

मडगाव येथून वंदे भारत दुपारी 2.35 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ 5.35 आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.

मंगळवार वगळता सर्व दिवस ही एक्सप्रेस धावणार आहे.

तिकिट दर?

मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांचा आवाक्याच्या बाहेरचे आहेत. या गाडीचे चेअर कारचे तिकीट 1580 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट 2870 रुपये आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार यात बदल होण्याची शक्यता आहे.

Goa-Mumbai Vande Bharat Express
Mauvin Godinho: परिवहन मंत्र्यांकडून 10 स्पीड पोर्टेबल रडार गन ट्रॅफिक विभागाककडे सुपूर्द

16 मे रोजी झाली होती चाचणी...

16 मे रोजी सीएसएमटी-मडगांव दरम्यान वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणी आणि महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासणीनंतर अखेर शनिवार 3 जून रोजी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस प्रत्यक्ष रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या चार वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. महाराष्ट्रासाठी ही पाचवी वंदे भारत ट्रेन असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com