Mumbai-Goa Vande Bharat Express  Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून धावणार; मडगाव रेल्वे स्थानकावर जय्यत तयारी

वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार आहे

Rajat Sawant

Mumbai-Goa Vande Bharat Express: ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे गोवा-मुंबई सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख पूढे ढकलण्यात आली होती.

अखेर वंदे भारत एक्सप्रेस उद्यापासून कोकण रेल्वेच्या मुंबई गोवा मार्गावर धावणार आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार आहे.

गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार? याची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती. गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून सुरु होणार आहे. लोकार्पणासाठी वंदे भारत मडगाव स्थानकावर दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर मडगाव रेल्वे स्थानकावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उद्या सकाळी वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने मडगाव रेल्वे स्थानकावर होणार असून मडगाव येथून सुटणार आहे. वंदे भारत ट्रेन मुंबई ते मडगाव अंतर अंदाजे 7.5 तासात पूर्ण करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबईसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. गोवा-मुंबई, बेंगळुरू-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर या पाच वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून धावणार आहेत.

दरम्यान, पूर्वी आठवड्यातून सहा दिवस धावणार असे जाहीर केलेल्या या ट्रेनच्या वेळापत्रकात ऐन पावसाळ्यात बदल करण्यात आला आहे. ट्रेन आता आठवड्यातून केवळ तीनच दिवस धावणार आहे.

मान्सूनमुळे कोकण रेल्वे मार्गावर वेग मार्यादा लागू करण्यात आल्याने ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, 7.50 तासांत पूर्ण होणारा हा प्रवास मान्सून काळात पूर्ण व्हायला दहा तास लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT