Kadamba Interstate bus : राज्यात मान्सूनला सुरवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही काही ठिकाणी सुरु आहे. मार्गाचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी भले मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. मुसळधार पाऊस पडल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच महामार्गावर काम सुरु असलेल्या काही ठिकाणी सूचना फलक लावले नसल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. पेडणेतील तोरसे येथे कदंबा इंटरस्टेट बस रुतल्याची माहिती समोर येत आहे. यात बसचे नुकसान झाले आहे.
कदंबा इंटरस्टेट बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने येत होती. मुंबई-गोवा महामार्गावर तोरसे येथे बसचा टायर चिखलात रुतला. चालकाने प्रयत्न केले असता बस बाहेर आली नाही.
दरम्यान, कदंबा खड्ड्यात रुतल्याचा अशीच एक घटना दक्षिण गोव्यातील जांबावली याठिकाणी घडली होती. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या कदंबाचे चाक रस्त्यावरील चिखलमय खड्ड्यात रुतले.
बस खड्ड्यातून पुढे बाहेरच येत नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसला धक्का देण्याची वेळ आली. 'श्री रामनाथ दामोदर महाराज की जय' जयघोष करत विद्यार्थ्यी चिखलात रुतलेली बस ढकलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.