Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबई-गोवा महामार्ग हायस्पीड होणार

मुंबई-गोवा महामार्ग पुणे द्रुतगती आणि समृद्धी महामार्गासारखा विकसित करणार.

Pramod Yadav

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग पुणे द्रुतगती आणि समृद्धी महामार्गासारखा विकसित करणार. अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रविवारी रात्री ठाण्यातील 'मालवणी महोत्सवा'च्या समारोप समारंभात बोलत होते.

मुंबई ते गोवा दरम्यानचा द्रुतगती मार्ग पुनर्विकास करून हायस्पीड करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्गकडे (Sindhudurg) जाणाऱ्या कोस्टल रोडचेही रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(Mumbai-Goa to SOON get new expressway like Nagpur Samruddhi Mahamarg: Maharashtra CM)

नागपूर ते मुंबईला (Nagpur to Mumbai) जोडणाऱ्या समृद्धी महामार्गचे (Smaruddhi Mahamarg) काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा महामार्ग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि शिवसेना यांचे राज्यात युतीचे सरकार होते. त्याकाळात या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती.

या महामार्गाची जबाबदारी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होती. त्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई ते नागपूर हे अंतर खूपच कमी झाले असून पूर्वी 12 ते 15 तासांचा प्रवास आता 7 ते 8 तासांत पूर्ण होत आहे.

त्याचप्रमाणे आता मुंबई-गोवा महामार्गाचाही विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. सततच्या अपघातांमुळे मुंबई-गोवा महामार्ग बदनाम आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर रस्ते अपघातात 23 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सरकारही अडचणीत आले होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT