Ravindra Chavan And Ramdas Kadam Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली, रामदास कदमांनी भाजप मंत्र्यांचा राजीनामाच मागितला

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरुन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरुन महायुतीत शाब्दिक चकमक झाली आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway

गणेशोत्सव जवळ आला असताना मुंबई गोवा महामार्गावरुन महायुतीत चांगलीच जुंपली आहे. 'सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण कुचकामी आहेत. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा', अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.

'युती धर्म पाळण्याचा अधिकार सर्वांचा आहे, फक्त रविंद्र चव्हाणांचा नाही. जशाच तसे उत्तर देण्यास मी सक्षम आहे', असे प्रत्युत्तर चव्हाण यांनी रामदास कदमांना दिले.

संजय राऊतांनी सोमवारी (१९ ऑगस्ट) सकाळी पत्रकार परिषदेत मुंबई - गोवा महामार्गावरुन सरकारवर टीका केली. रस्त्याचा पैसा ठेकेदाराद्वारे खडड्यात आणि सरकराच्या खिशात जात असल्याचा आरोप राऊतांनी केला.

यातच भर म्हणून रामदास कदमांनी महायुती सरकारला घरचा आहेर देत मुंबई - गोवा महामार्गावरुन टीकास्त्र सोडले. दरम्यान रामदास कदमांच्या बोचऱ्या टीकेने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. प्रकरण फडणवीसांपर्यंत पोहोचले असून, भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.

रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, राजीनामा घ्या; रामदास कदम (Ramdas Kadam On Mumbai Goa Highway)

'१४ वर्षांनी प्रभू श्री रामांचा देखील वनवास संपला. पण, मुंबई गोवा महामार्गाचा वनवास काही संपत नाही. याचे दु:ख माझ्या मनात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे. शिष्टमंडळ घेऊन मी त्यांना भेटणार आहे. आमचे गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाहीत. आम्ही काय पाप केलंय?'

'महामार्गावरील अनेक पूल अजून झालेले नाहीत. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. केवळ पाहणी दौरे कशासाठी. देवेंद्र फडणवीसांनी रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा. अतिशय कुचकामी मंत्री आहेत', असे रामदास कदम म्हणाले.

रामदास कदमांनी महायुतीला घरचा आहेर दिला अशी बातमी येणाराय याची मला कल्पना आहे पण माझा नाईलाज आहे, असेही कदम म्हणाले.

...अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही; रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर (PWD Minister Ravindra Chavan Reply to Ramdas Kadam)

रामदास कदमांच्या टीकेवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिले. युती धर्म पाळण्याचा अधिकार सर्वांचा आहे, तो केवळ रविंद्र चव्हाणांचा नाही. आम्हाला वेगळ्या भाषेत बोलता येते.

एकदा समोर या मग सांगतो. आम्हालाही मर्यादा सोडून बोलता येते फक्त युतीचा धर्म आम्ही पाळत आहोत. रामदास कदमांनी विचार करुन बोलावे अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

भाईंचे म्हणंण जाणून घेणार; देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

'अशाप्रकारचे आरोप करणे कोणत्या युती धर्मात बसते? रामदास कदमांचे काही म्हणंण असेल तर त्यांनी ते रितसर मांडले पाहीजे. प्रत्येकवेळी भाजप किंवा भाजपच्या मंत्र्यांना वेठीस धरणे यातून चांगली भावना तयार होत नाही. रामदास भाईंचे काय म्हणणं आहे जाणून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करु', असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महायुतीत वादाची ठिणगी (Mahayuti)

'मुंबई गोवा महामार्गावरुन रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडलीय. राक्षसी महत्वकांक्षा असतील तर युती तोडा', असे थेट आवाहन त्यांनी केलंय.

रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना असे वक्तव्य शोभत नाही, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले. महायुती सामान्य नागरिक आणि महाराष्ट्राची गरज आहे, त्यात रामदास कदमांनी मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे दरेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT