Mumbai Goa Highway: महाराष्ट्रात मुंबई- गोवा महामार्गावरून राजकारण तापले, संजय राऊतांचा शिंदेवर नेम

Sanjay Raut On Mumbai Goa Highway: सर्व पैसा रस्ता ठेकेदाराच्या माध्यमातून खड्ड्यात जातो आणि सरकारच्या खिशात जातो - संजय राऊत
Mumbai Goa Highway: मी साक्षीदार!  गणपतीला गोव्याकडे जाणाऱ्या मराठी बांधवांचे हाल, राऊत म्हणाले, 'पैसे खड्डयात जातायेत'
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Highway

मुंबई : मुंबई गोवा महामार्गाचा वनवास संपण्याचे नाव घेत नाही. आगमी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. दरम्यान, गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला तरी महामार्गाची अवस्था दयनीय आहे. महामार्गावरील खड्ड्यांता त्रास वाहन चालकांना होत असून अपघातांना निमंत्रण देत आहे. शिवेसना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महामार्गाच्या अवस्थेबाबत खंत व्यक्त करत ते स्वत: याचे साक्षीदार असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊतांनी आज (१९ ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेवर देखील भाष्य केले.

काय म्हणाले संजय राऊत? (Sanjay Raut On Mumbai Goa Highway)

'मुंबई- गोवा महामार्गाचे दुःख कायम आहे. विशेषतः गणपतीच्या सणाला त्या रस्त्यावरून गोव्याकडे जाणारे मराठी बांधव आहेत त्यांचे काय हाल होतात मी स्वतः एक साक्षीदार आहे. कारण मी स्वतः कोकणात गावाला जातो. आत्ताच मी घरी चर्चा करत होतो रस्ते एवढे खराब आहेत पोहोचायचं कसं? सर्व पैसा रस्ता ठेकेदाराच्या माध्यमातून खड्ड्यात जातो आणि सरकारच्या खिशात जातो' असा आरोपच त्यांनी शिंदे सरकारवर केला.

Mumbai Goa Highway: मी साक्षीदार!  गणपतीला गोव्याकडे जाणाऱ्या मराठी बांधवांचे हाल, राऊत म्हणाले, 'पैसे खड्डयात जातायेत'
Varsha Usgaonkar: गोवा कॅबिनेट मंत्र्याची लेक ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, वर्षा उसगांवकर यांचा जीवनप्रवास

मुंबई गोवा महामार्ग गेल्या बारा वर्षापासून रखडला आहे. महामार्गावर आत्तापर्यंत सात हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. पनवेल ते इंदापूर हा ८४ किमी लांबीचा मार्ग येत्या डिसेंबरप्रर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. NHAI च्या वतीने या मार्गाचे काम केले जात असून, यासाठी ९०० कोटी रुपयेअंदाजित खर्च होणे अपेक्षित होते पण आत्तापर्यंत यासाठी १२०० कोटी खर्च झालेत.

तर महाराष्ट्र बांधकाम खात्याच्या वतीने ३५५ किमी मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी आत्तापर्यंत ६१०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही यातील ८४ किमी मार्गाचे काम अद्याप पूर्ण होणे बाकी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com