Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: हायवेचे काम अपूर्ण टोल वसुली मात्र सुरू, मुंबई गोवा महामार्गावर पहिल्या टोलचा शुभारंभ

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बॉर्डरवरील हातिवले (राजापूर तालुका) हा टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील 12 वर्षांपासून सुरू असून, ते अपूर्ण अवस्थेत आहे. पण, मुंबई - गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका आजपासून (दि.11) सुरु झाला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बॉर्डरवरील हातिवले (राजापूर तालुका) हा टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे. सकाळ सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे. दरम्यान, या टोलवसुलीला विरोध देखील होत आहे. (Toll collection started on Mumbai Goa Highway)

कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडियाकडे जबाबदारी

या टप्प्यातील जवळपास 98.02 टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय NHAI ने घेतलाय. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व स्थानिकांनी टोलानाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता. त्यानंतर हातिवले येथील टोल नाका सुरू झाल्याने पुन्हा एकदा त्याला स्थानिकांकडून विरोध होताना दिसत आहे. आज सकाळी अचानक टोल वसुली सुरू झाल्याने काही वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

शुल्क आकारणी सुरू झाल्यानंतर या टोलनाक्यावर कारसाठी वन वे 90 रुपये भरावे लागतील. तर ट्रक बससाठी 295 रुपये आकारले जात आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 वर्षांपासून रखडलाय

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 वर्षांपासून रखडला असून, महामार्गाचे काम धीम्यागतीने सुरु आहे. पाचल - रत्नागिरी ते पनवेल दरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महामार्गाची हवाई पाहणी केली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार असून, जानेवारी 2024 मध्ये रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT