Landslide At Malpe Pernem Goa Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: पेडण्यात मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा कोसळली दरड, दोन्ही लेनवरील वाहतूक ठप्प

Landslide At Malpe Pernem: तांबड्या मातीच्या ढीगाऱ्यासह जांभे दगड देखील महामार्गावर आल्याने मार्गावरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद झाल्या आहेत.

Pramod Yadav

मुंबई - गोवा महामार्गावर पेडणे येथे पुन्हा दरड कोसळल्याने दोन्ही लेनवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मालपे न्हयबाग येथे रस्ता कडेला संरक्षक भिंतीवरील तांबड्या मातीचा भराव रस्त्यावर आल्याने महामर्गावरील वाहतूक बंद झालीय. पंधरा दिवसात त्याच भागात दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडलीय.

दुपारी बाराच्या सुमारास ही घटना समोर आली. गेल्या दोन दिवासांपासून राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. राज्यात अनेक पडझडीच्या घटना घडत असताना मालपे येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळण्याचा प्रकार समोर आला.

तांबड्या मातीच्या ढीगाऱ्यासह जांभे दगड देखील महामार्गावर आल्याने मार्गावरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद झाल्या आहेत. गेल्या महिन्यात २२ जून रोजी अशाच प्रकारे दरड कोसळून मोठा दगड महामार्गावर आल्याने सिंधुदुर्गकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पंधरा दिवसांच्या कालावधीत त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडल्याने विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत.

कंत्राटदाराला अटक करुन काळ्या यादीत टाका

पेडण्यात राष्ट्रीय महामार्ग -६६ वर पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली. भाजपचा जावई असलेली एमव्हीआर इन्फ्रा कंपनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींना पेडण्यात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतायेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कंत्राटदाराला अटक करुन काळ्यात यादी टाकावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्य अमित पाटकर यांनी केली आहे.

जुन्या मार्गावरून वाहतूक सुरु

काही महिन्यापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पण गेल्या पंधरा दिवसांत घडलेल्या दोन घटनानंतर या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावरुन सुरु ठेवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे सैल झालेले मातीचे ढीगारे आणि निकृष्ट दर्जाची संरक्षक भिंतीचे काम यामुळे दरड कोसळून मार्गावर येत आहे. यामुळे वाहतुकीला फटका बसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT