Goa Flight: पावसाचा गोवा फ्लाईटला फटका, मोपावर उतरणारे विमान थेट बंगळुरुला डायव्हर्ट

Flights To Goa: गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक ठिकाणची विमानसेवा विस्कळीत झाली आहे.
पावसाचा गोवा फ्लाईटला फटका, मोपावर उतरणारे विमान थेट बंगळुरुला डायव्हर्ट
Qatar Flight QR522Dainik Gomantak

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गोव्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात अनेक ठिकाणी विविध दुर्घटना घडत आहेत. खराब हवामानाचा देशभरातील विमानसेवेला देखील फटका बसला आहे. कतार एअरवेजची उत्तरेतील मोपावर उतरणारी फ्लाईट थेट बंगळुरुला वळवण्यात आली. गोव्यातून थेट कर्नाटकात फ्लाईट डायव्हर्ट केल्याने प्रवासी संतप्त झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजची फ्लाईट QR522 उत्तर गोव्यातील मनोहर विमानतळावर उतरणार होती. पण, खराब हवामानामुळे विमान थेट कर्नाटकातील बंगळुरुला वळवण्यात आले. दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ जवळ असताना बंगळुरुला का वळवण्यात आले असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.

गेव्यात दोन दिवसांपासून पावासाची संततधार सुरु आहे. मंगळवारी सकाळी देखील पाऊस सुरुच असल्याने कतार एअरवेजचे विमान बंगळुरुला वळवण्यात आले. मोपावर इंस्ट्रुमेट लॅण्डींग सर्व्हिस उपलब्ध नसल्याने विमान वळवण्यात आले, अशी माहिती कतार एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आमदार मायकल लोबो यांनी याप्रकरणी आगामी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे म्हटले आहे.

पावसाचा गोवा फ्लाईटला फटका, मोपावर उतरणारे विमान थेट बंगळुरुला डायव्हर्ट
Goa Monsoon: दोन दिवसांत पाच बळी, थार वाहून गेली, भिंत कोसळली; गोव्यात पावसाचा हाहाकार

मुंबई विमानतळवरील ५० फ्लाईट्स वळवल्या

खराब हवामानाचा मुंबई विमानतळाला देखील बसला असून, विमानतळावर उतरणाऱ्या अथवा उड्डाण घेणाऱ्या सुमारे ५० फ्लाईट्स इतरत्र वळवण्यात आल्या तर काही फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. यामध्ये अहमदाबाद, इंदोर आणि हैद्राबाद येथील फ्लाईट्सचा समावेश आहे.

मुंबईतून अहमदाबाद वल्लभभाई पटेल विमानतळावर येणाऱ्या किंवा मुंबईत येणाऱ्या सुमारे ४० फ्लाईट रद्द व वळवण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com