Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गासाठी नवी डेडलाईन; आता मार्च 2026 ला पूर्ण होणार महामार्ग

Mumbai Goa Highway Update: गेल्या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जानेवारी २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते.

Pramod Yadav

मुंबई – गोवा महामार्गाचे काम काही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री काम पूर्ण होण्यासाठी एक डेडलाईन देतात तर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री वेगळी डेडलाईन देत आहेत. यामुळे महामार्ग नक्की केव्हा पूर्ण होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या १४ वर्षापासून मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या ठेकेरांसोबत दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश गडकरींनी ठेकेदारांना दिले आहेत. काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यास गडकरींनी नकार दिला आहे. मार्च २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेश गडकरींनी दिले.

महामार्गावरील आरवली ते कांटे (३९ किमी) आणि कांटे ते वाकेड (४९ किमी) हे दोन टप्पे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना मुदतवाढ हवी आहे. पण, मंत्री गडकरी यांनी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, यासाठी २५० ते ३०० कोटी वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे. आगामी गणेशोत्सवात कोकणातील गणेश भक्तांना रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा फटका बसणार आहे.

 शिवेंद्रराजे यांनी दिली होती जानेवारी २०२६ ची डेडलाईन

गेल्या अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रश्नाला उत्तर देताना डिसेंबर २०२५ नाही पण, जानेवारी २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. यावेळी त्यांनी महामार्गाचे काम रखडल्याचे कबुल करताना कामात दिरंगाई आणि निष्काळजी करणाऱ्या कंत्राटदारांना दंड ठोठावला असल्याचे भोसले म्हणाले होते.

गोव्याच्या खासदाराचा राज्यसभेत प्रश्न

गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी गोवा – मुंबई महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल, असा प्रश्न राज्यसभेत उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नितीन गडकरींनी सप्टेंबर २०२५ ही डेडलाईन दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

Video: लष्करी अधिकाऱ्याची दादागिरी! श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा मोडला

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT