Fake Hotel Booking: गोव्यात आलिशान स्पा रिसॉर्टच्या नावाखाली गंडवले; दिल्लीतील व्यक्तीने गमावले 33,000 रुपये

Online Hotel Booking Scam: बनावट बुकिंगच्या नावाखाली ३३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने या व्यक्तीने पैसे दिले.
Delhi tourist loses ₹33,000 in fake spa resort scam in Goa
Goa online booking fraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आलिशान हॉटेल चेन असलेल्या गोव्यातील ललित हॉटेलमध्ये रुम बुक करण्याच्या नावाखाली दिल्लीतील व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाली. ललित हॉटेलचा प्रतिनिधी असल्याचे भासवून एकाने दिल्लीतील व्यक्तीला ३३ हजार रुपयांचा गंडा घातला. गुरुवारी हा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी हरियाणा पोलिसांनी शाहरुख खानला (२५) अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शाहरुखने बनावट संकेतस्थळ निर्माण करुन हॉटेल बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक केली.

दिल्लीतील व्यक्ती गोव्यातील ललित गोल्फ आणि स्पा रिसॉर्टमध्ये बुकिंग करत होता. दरम्यान, त्याची बनावट बुकिंगच्या नावाखाली ३३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने या व्यक्तीने पैसे दिले.

Delhi tourist loses ₹33,000 in fake spa resort scam in Goa
Odei Onaindia: ..सदैव गौर! कर्णधार ओडेईला FC Goa चा निरोप

आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यक्तीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक मदतीने संशयित खानला अटक केली. खानने ऑनलाईन हॉटेल बुकिंगसाठी बनावट संकेतस्थळ निर्माण केले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक फोटो, व्हिडिओ आणि ऑफरचा त्यावर समावेश करण्यात आला होता.

शाहरुखने अधिक लोकांना टार्गेट करण्यासाठी संकेतस्थळ ऑनलाईन पद्धतीने प्रमोट केले होते. डिस्काऊंटच्या माध्यमातून तो ग्राहकांना आकर्षित करत असे. हॉटेलचा प्रतिनिधी असल्याचे भासवून तो फसवणूक करत होता. पैसे मिळाल्यानंतर तो ग्राहकांना बनावट पावती पाठवत होता. दरम्यान, चौकशीअंती असे बुकिंग न झाल्याचे ग्राहकांना समजल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे समजते.

Delhi tourist loses ₹33,000 in fake spa resort scam in Goa
Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ ढकलला पुढे! काँक्रिटीकरणामुळे विलंब; 14 जुलै रोजी होणार उद्धाटन

दरम्यान, यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना गोव्यात घडल्या आहेत. मोठ्या हॉटेलच्या नावाने बनावट संकेतस्थळ निर्माण करुन ग्राहकांची फसवणूक केली जाते आणि संबधित ठिकाणी चौकशी अथवा प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर बुकिंग झाले नसल्याचे उघडकीस येते. यामुळे ग्राहकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विश्वासार्ह पोर्टल किंवा प्रत्यक्ष नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com