Iran US Israel War: इराणवर आतापर्यंतचा सर्वात भीषण प्रहार! 'युद्ध आमच्याच अटींवर संपणार', अमेरिकन संरक्षण सचिवांची गर्जना

Pete Hegseth Iran Air Strike Announcement: 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर सुरु झालेला अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला आता एका भीषण महायुद्धाच्या वळणावर येऊन पोहोचला.
Pete Hegseth Iran Air Strike Announcement
Pete HegsethDainik Gomantak
Published on
Updated on

Pete Hegseth Iran Air Strike Announcement: 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर सुरु झालेला अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला आता एका भीषण महायुद्धाच्या वळणावर येऊन पोहोचला. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या या संघर्षात इराण कोणत्याही परिस्थितीत झुकण्यास तयार नाही, तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायलने तेहरानला गुडघे टेकण्यास भाग पाडण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब केला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी गुरुवारी (19 मार्च) अत्यंत आक्रमक विधान करत इराणला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हवाई हल्ल्याचा इशारा दिला. आखाती युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करताना हेगसेथ यांनी स्पष्ट केले की, हे युद्ध केवळ आणि केवळ अमेरिकेच्या अटींवरच संपेल.

व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हेगसेथ यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा लेखाजोखा मांडला. त्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने आतापर्यंत इराणमधील 7000 हून अधिक लष्करी तळांना आणि महत्त्वाच्या ठिकाणांना यशस्वीरित्या लक्ष्य केले. गुरुवारी हा आकडा विक्रमी स्तरावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आता पूर्णपणे खिळखिळी झाली असून ती अमेरिकेच्या हल्ल्यांपुढे 'निरुपयोगी' ठरली, असा दावाही त्यांनी केला. खार्ग बेटावरील लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या भविष्यावर आता अमेरिकेचे नियंत्रण आले. इराणची प्रतिकार करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमकुवत होत असताना अमेरिकेची ताकद मात्र वाढत चालली आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.

Pete Hegseth Iran Air Strike Announcement
Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

नौदलाच्या आघाडीवरही इराणला मोठा फटका बसला आहे. हेगसेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणची 120 हून अधिक नौदलाची जहाजे उद्ध्वस्त केली किंवा समुद्रात बुडवली आहेत. याशिवाय इराणच्या 11 पाणबुड्या देखील नष्ट करण्यात आल्या आहेत. इराणकडून होणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये तब्बल 90 टक्क्यांनी घट झाली आहे, जे अमेरिकेच्या हवाई वर्चस्वाचे प्रतीक मानले जात आहे.

Pete Hegseth Iran Air Strike Announcement
Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

या पत्रकार परिषदेत हेगसेथ यांनी बुधवारी मायदेशी परतलेल्या त्या शहीद अमेरिकन सैनिकांचाही उल्लेख केला, ज्यांनी इराण युद्धाच्या मैदानात आपल्या प्राणांची आहुती दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शहीद कुटुंबांची भेट घेतल्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, 'जोपर्यंत मोहीम फत्ते होत नाही, तोपर्यंत थांबू नका' हा शहीद कुटुंबांचा आग्रह आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यांच्या बलिदानाचा सन्मान करत हे मिशन तडीस नेले जाईल.

Pete Hegseth Iran Air Strike Announcement
Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

इराणच्या लष्करी नेतृत्वावर टीका करताना हेगसेथ यांनी उपहासात्मकपणे म्हटले की, तिथे वरिष्ठ कमांडरची नोकरी आता 'तात्पुरती' उरली आहे, कारण कोणताही कमांडर जास्त काळ टिकू शकत नाही. अमेरिकन सैन्य सध्या इराणच्या गुप्त बोगद्यांवर, क्षेपणास्त्र तळांवर आणि ड्रोन केंद्रांवर अत्यंत अचूक आणि भीषण हल्ले करत आहे. जागतिक स्तरावर या युद्धाचे परिणाम गंभीर होत असताना अमेरिकेने घेतलेली ही कठोर भूमिका येणाऱ्या काळात इराणची कोंडी अधिक घट्ट करणार असल्याचे संकेत देत आहे. तेहरानकडून होणाऱ्या प्रतिकाराची धार कमी झाली असली तरी, अमेरिका आपले 'मिशन इराण' पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com