Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर पुन्हा अपघात, माजी सभापतींचा मुलगा जागीच ठार

Mumbai Goa Highway Accident Death: अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident Death

रायगड: मुंबई - गोवा महामार्गावरील अपघाताचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. अपघातात बळी गेल्याप्रकरणी दोन कंत्राटदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात असताना, महामार्गावर झालेल्या अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. माणगाव रेल्वे स्थानकाजवळ रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

यज्ञेश उभारे असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. यज्ञेश माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव रेल्वे स्थानकाजवळ भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने यज्ञेश उभारे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात जखमी झालेल्या यज्ञेशचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

यज्ञेश बुलेटवरुन जात असताना भरधाव टेम्पो दुचाकीला जोराची धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची माहिती घेत पंचनामा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर महामार्गावरील अपघातास जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अभियंता सुजित कावळेला अटक करण्यात आलीय.

दरम्यान, गेल्या चार वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर लहान मोठे १७० अपघात झाले असून, त्यात ९७ जणांचा बळी गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT