पणजी: गोव्यात सायबर गुन्ह्याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशिक्षितच नव्हे उच्च शिक्षित ते उद्योगपती देखील या सायबर फ्रॉडला (cyber fraud) बळी पडत आहेत. ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळी आमिषे दाखवून लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यावरुन गोवा पोलिसांच्या (goa police) सायबर क्राईम विभागाने राज्यातील नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.
गुतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक (Investment Fraud)
गोव्यात अलिकडे गुतवणुकीतून मोठा परतावा देण्याचे किंवा कार देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर मार्गाने लोकांना संपर्क साधतात आणि गुंतवणुकीतून मोठ्या परताव्याचे आमिष देतात.
लोक देखील पैशाच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अशा आमिषांना बळ पडू नये, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस निरिक्षक विद्यानंद पवार यांनी केले आहे.
तात्काळ तक्रार दाखल करण्याचे आवाहन (How And Where To File Cyber Crime complaint)
सायबर क्राईम संबधित कोणतीही घटना घडल्यास किंवा कोणी संपर्क साधून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्यास याप्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करवी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिकांना सायबर क्राईम संबधित तक्रार १९३० संपर्क क्रमांक आणि cybercrime.gov.in या संकेतस्थळावर करता येईल, असे पोलिसांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.