Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Goa Under 19 Women Cricket: सामना शुक्रवारी पुदुचेरी येथे झाला. नाणेफेक जिंकून गोव्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांनी ४ बाद १३० धावा केल्या.
Goa Under 19 Women Cricket
Goa Women CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामन्याची मानकरी पूजा कलेल (५-१५) व निखिला नाईक (३-८) यांची प्रभावी गोलंदाजी, तसेच अथश्री शिवारकर हिचे धडाकेबाज अर्धशतक (नाबाद ६६) या लाजबाव कामगिरीच्या बळावर गोव्याने १९ वर्षांखालील महिला आंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेशला १८ धावांनी नमविले.

सामना शुक्रवारी पुदुचेरी येथे झाला. नाणेफेक जिंकून गोव्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांनी ४ बाद १३० धावा केल्या. अथश्रीने ५३ चेंडूंतील खेळीत आठ चौकार व एक षटकार मारला. तिने उस्मा खान (२४) हिच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.

Goa Under 19 Women Cricket
Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

नंतर डावखुरी फिरकी गोलंदाज पूजा व ऑफस्पिनर निखिला यांनी हिमाचल प्रदेशचा डाव १८.५ षटकांत ११२ धावांत गुंडाळला. गोव्याचा हा स्पर्धेतील तीन सामन्यांतील दुसरा विजय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com