Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Sporting Club Goa Charity Cup: चॅरिटी कप फुटबॉल लढतीने शनिवारी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) २०२६-२७ मोसमाचा पडदा उघडणार आहे.
Sporting Club Goa Charity Cup
Goa SportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चॅरिटी कप फुटबॉल लढतीने शनिवारी (ता. १२) गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) २०२६-२७ मोसमाचा पडदा उघडणार आहे. राय पंचायत मैदानावर गतवेळच्या प्रोफेशन लीग विजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघासमवेत धेंपो स्पोर्टस क्लबचे तगडे आव्हान असेल.

धेंपो क्लबविरुद्धच्या लढतीत स्पोर्टिंग क्लबच्या नवोदित खेळाडूंवर लक्ष असेल, तसेच या संघाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने दीपांकर शर्मा यांचाही पहिलाच स्पर्धात्मक सामना असेल. गतवर्षीही स्पोर्टिंग क्लबने चॅरिटी कप लढतीत बाजी मारली होती. गोलशून्य बरोबरीनंतर त्यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये धेंपो स्पोर्टस क्लबला ४-२ फरकाने हरविले होते.

Sporting Club Goa Charity Cup
Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

स्पोर्टिंग क्लबने नव्या मोसमासाठी आठ नव्या युवा खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यात सां जुझे द आरियल येथील २० वर्षीय मध्यक्षक अ‍ॅश्नॉय गोम्स आणि रायचा २० वर्षीय आघाडीपटू गॅरिसन फर्नांडिस यांचा समावेश आहे. सांगे येथील २४ वर्षीय ऋतिक बांदोडकर आणि केपेचा १९ वर्षीय अ‍ॅलिटन फुर्तादो हे दोघेही आघाडीपटू आहेत.

चिंचोणेचा २१ वर्षीय डेल्मन रिबेलो बचावफळीला बळकटी देईल. वेगवान आघाडीपटू मेव्हन डायस २३ वर्षांचा असून तो विंगर म्हणूनही खेळू शकतो. गोलरक्षक फ्रेव्हिनो फर्नांडिस २२ वर्षांचा आहे. नागोवाचा २३ वर्षीय वेलांको रॉड्रिग्ज हा आक्रमक मध्यरक्षक आणि विंगर म्हणून छाप पाडू शकतो. याशिवाय मागील मोसमातील विजेत्या संघातील आयव्हन कॉस्ता, धीरज चौहान आणि अ‍ॅरॉन बार्रेटो परिचित चेहरेहीमैदानात उतरतील.

Sporting Club Goa Charity Cup
Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com