Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर व्यवसाय सुरु करण्याची गोवेकरांना संधी; निविदा निघाली, आजच करा अप्लाय

गोवेकरांसाठी व्यवसाय सुरु करण्याची ही सुवर्णसंधी असून, त्यासाठी निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल.

Pramod Yadav

Dabolim Airport: दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर व्यवसाय सुरु करण्याची संधी निर्माण झाली आहे. विमानतळावर विविध दुकानांसाठी गाळे उपलब्ध असून, यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गोवेकरांसाठी व्यवसाय सुरु करण्याची ही सुवर्णसंधी असून, त्यासाठी निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे. विमानतळाने दिलेल्या निविदेच्या माहितीनुसार, पुस्तके आणि व्हिडिओ, खेळणी आणि गेम्स, फूटवेअर, सेन्ट, परफ्युम यासारखी उत्पादने तसेच, वेलनेस स्टोअरसाठी या जागांचा उपयोग करता येईल असे विमानतळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ गोव्यातील एक अतिशय व्यस्त विमानतळ आहे. उत्तर गोव्यात झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर हे विमानतळ मागे पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, दाबोळीवर देखील मोठ्या प्रमाणावर विमानांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fight Video: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अलीमध्ये जुंपली, पाहा व्हिडिओ

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"अश्लील फोटो पाठवले आणि...", 'WWE'मध्ये मोठी खळबळ, सुपरस्टार खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

SCROLL FOR NEXT