Fight Video: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अलीमध्ये जुंपली, पाहा व्हिडिओ

David Warner Moeen Ali Fight Video: पाकिस्तान सुपर लीग (PSL) सध्या आपल्या खेळामुळे कमी आणि मैदानाबाहेरील वादांमुळेच जास्त चर्चेत आहे.
David Warner-Moeen Ali Big Fight In PSL
David Warner Moeen Ali fight videoDainik Gomantak
Published on
Updated on

 David Warner And Moeen Ali Fight

पाकिस्तान सुपर लीग (PSL) सध्या आपल्या खेळामुळे कमी आणि मैदानाबाहेरील वादांमुळेच जास्त चर्चेत आहे. गुरुवारी, २ एप्रिल रोजी कराची किंग्स आणि रावळपिंडीज यांच्यात झालेल्या सामन्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराची किंग्सने विजय मिळवला असला तरी, सामन्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांच्यात भरमैदानात तीखी डोकझोंक पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर फजीहत होत आहे.

भरमैदानात बाचाबाची

कराची किंग्सने या सामन्यात रावलपिंडीजवर ५ गडी राखून विजय मिळवला. मात्र, सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघ हस्तांदोलन करत होते, तेव्हा अचानक कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अली यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

David Warner-Moeen Ali Big Fight In PSL
Goa Job Scam: गोव्यात आणखी एक 'कॅश फॉर जॉब'? विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; 9 जणांची पोलिसांत तक्रार

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही अत्यंत रागात एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, कराची टीमचे संचालक हैदर अजहर यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी तातडीने वॉर्नरला बाजूला नेले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला. या वादाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी एकाच संघातील दोन दिग्गज खेळाडू अशा प्रकारे भिडल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

David Warner-Moeen Ali Big Fight In PSL
Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्या’ कथित स्कँडलची निर्माती शिक्षिका

कराची किंग्सची विजयी घोडदौड सुरूच

मैदानातील वादाचा पडदा बाजूला सारला, तर डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली कराची किंग्सने या हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. रावळपिंडीजविरुद्धचा हा त्यांचा सलग तिसरा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना पिंडीजने २० षटकांत ६ बाद १९७ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, कराचीच्या फलंदाजांनी हे आव्हान पेलले. विशेषतः आझम खानने अवघ्या ३४ चेंडूत ७४ धावांची तुफानी खेळी करत संघाला ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला. मात्र, या विजयाच्या आनंदापेक्षा वॉर्नर-मोईन वादाचीच चर्चा जास्त रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com