"अश्लील फोटो पाठवले आणि...", 'WWE'मध्ये मोठी खळबळ, सुपरस्टार खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप

Brock Lesnar Sexual Assault Allegations : जागतिक कुस्ती क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या WWE मध्ये सध्या 'रेसलमॅनिया ४२' (WrestleMania 42) ची जय्यत तयारी सुरू आहे.
Brock Lesnar sexual assault allegations
Brock Lesnar sexual assault allegationsDainik Gomantak
Published on
Updated on

जागतिक कुस्ती क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या WWE मध्ये सध्या 'रेसलमॅनिया ४२' (WrestleMania 42) ची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या मोठ्या सोहळ्यापूर्वीच दिग्गज सुपरस्टार ब्रॉक लैसनर (Brock Lesnar) एका अतिशय गंभीर आणि किळसवाण्या वादात अडकला आहे. जेनेल ग्रांट नावाच्या महिलेने लैसनरवर अश्लील मागणी आणि लैंगिक छळाचे नवीन आरोप केल्यामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे लैसनरचे करिअर आणि आगामी मेगा इव्हेंटमधील त्याचा सहभाग धोक्यात आला आहे.

जेनेल ग्रांट यांचे धक्कादायक खुलासे

२०२४ च्या सुरुवातीला विन्स मॅकमॅहन यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. जेनेल ग्रांट यांनी न्यायालयात सादर केलेल्या ताज्या कागदपत्रांमध्ये लैसनरच्या वर्तणुकीवर बोट ठेवले आहे.

त्यांच्या आरोपानुसार, २६ डिसेंबर २०२१ रोजी ब्रॉक लैसनरने त्यांना न विचारता स्वतःचे अश्लील फोटो पाठवले होते. इतकेच नव्हे तर, ३१ डिसेंबर २०२१ रोजी लैसनरने त्यांच्याकडे अशा काही गोष्टींची मागणी केली जी अत्यंत मानहानीकारक होती. ग्रांट यांनी दावा केला आहे की, लैसनरच्या दबावामुळे त्यांना स्वतःचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवावा लागला, ज्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला.

Brock Lesnar sexual assault allegations
Goa Job Scam: गोव्यात आणखी एक 'कॅश फॉर जॉब'? विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; 9 जणांची पोलिसांत तक्रार

रेसलमॅनिया ४२ मधील सहभागावर प्रश्नचिन्ह

येत्या १८ आणि १९ एप्रिल रोजी होणाऱ्या 'रेसलमॅनिया ४२' मध्ये ब्रॉक लैसनरचा सामना उदयोन्मुख स्टार ओबा फेमी (Oba Femi) विरुद्ध निश्चित करण्यात आला होता. या दोघांमधील शत्रुत्व सध्या टोकाला पोहोचले असून ओबा फेमीने लैसनरला रिंगबाहेर फेकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. मात्र, आता लागलेल्या या गंभीर आरोपांमुळे WWE व्यवस्थापन लैसनरला पुन्हा एकदा रिंगपासून दूर ठेवण्याची शक्यता आहे. विन्स मॅकमॅहन यांच्यासोबत नाव जोडले गेल्यापासून लैसनर आधीच वादात होता, आता या नव्या गौप्यस्फोटांमुळे त्याच्या अडचणीत दुप्पट वाढ झाली आहे.

Brock Lesnar sexual assault allegations
Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्या’ कथित स्कँडलची निर्माती शिक्षिका

चाहत्यांमध्ये संतापाची लाट

सोशल मीडियावर ब्रॉक लैसनरच्या या कथित कृत्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर लैसनरला केवळ WWE मधूनच नव्हे, तर संपूर्ण कुस्ती क्षेत्रातून बहिष्कृत केले जाऊ शकते. सध्या तरी WWE ने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र रेसलमॅनियाच्या तोंडावर 'बीस्ट'वर लागलेला हा डाग कंपनीची प्रतिमा मलीन करणारा ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com