विष्णू शिरोडकर व मुग्धा गावकर रिकोर्डिंगच्या वेळी Dainik Gomantak
गोवा

मुग्धा गावकर हिच्या "सूरमई शाम" या संगीत कार्यक्रमाचे आजपासुन गोव्यात प्रसारण

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मुग्धा गावकर (Mugdha Gavkar) ही गोव्याची शास्त्रीय संगीतातील आघाडीची व प्रतिभाशाली  गायिका. गेल्या अनेक वर्षांपासुन तिने गोव्यातच नव्हे तर इतर राज्यातही अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला असुन ती फोंडा येथील शास्त्रीय गायक नितीन ढवळीकर यांच्या अभिनव कला मंदीरातर्फे अनेकांनी गायकिचे धडे देत आहे. (Mugdha Gavkar is one of Goa's leading and talented singers in classical music)

गेल्या सात आठ वर्षांपासुन तिने शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपला वेगळा असा खास ठसा उमटवला आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच अभंग व नाट्य गीत सादरीकरणातही तिने प्राविण्य मिळविले आहे.

गेल्या दीड दोन वर्षांत कोविड महामारीच्या काळात जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम होत नाहीत अशा परिस्थितीत स्वताच्या यु-ट्युब चॅनलद्वारे स्वता व इतर अनेक गायक व गायिकांसोबत गायिलेले व्हिडिओस संगीत प्रेमीच्या पसंतीस उतरले आहेत. उद्या 16 जुलै पासुन "सूरमई शाम" हा तिचा भावगीत, सुगम संगीतावर आधारीत एक आगळा वेगळा असा कार्यक्रम तिच्या मुग्धगंध यु-ट्युब चॅनलवरुन प्रसारीत होत आहे.

या कार्यक्रमाच्या संकल्पनेबद्दल तिच्य़ाशी संवाद साधला तेव्हा तिने सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासुन गोव्यात व गोव्याबाहेर आपले अनेक चाहते निर्माण झाले आहेत. आपण भावगीत व सुगम संगीतावर आधारीत गाणी सादर करावी अशी फर्माईश त्यांच्याकडुन झाली. आपल्या चाहत्यांनी अनेक गाण्यांची यादीच सादर केली. आपण त्यातील काही निवडक गाणी महिन्याला एक अशी प्रथम एका वर्षासाठी 12 गाण्यांची निवड केली आहे. त्यातील केवळ सहा गाण्यांचे रिकोर्डिंग झाले आहेत त्यात श्री रामचंद्र कृपालू भजमन (भजन), मी मज हरपून बसले ग (आशा भोसले यांचे गाणे), दिल चीज क्या है आप मेरी (गझल, ठुमरी पद्धतीची), हे शामसुंदरा, भातुकलीच्या खेळामधली, (मराठी गाणी) व आपकी नजरोने समझा (हिंदी फिल्मी गाणे) यांचा समावेश आहे. संगीत प्रेमी व चाहत्यांचा प्रतिसाद पाहुनच आणखी गाणी सादर केली जातील असे गावकर हिने सांगितले.

जी गाणी सादर केली जातील त्याला तबला किंवा इतर वाद्यांची साथ नसेल. गोव्याचे आघाडीचे संगीत संयोजक विष्णू शिरोडकर याचे या कार्यक्रमाला उत्तम सहकार्य लाभले असुन, ते केवळ कीबोर्ड द्वारे पार्श्र्वसंगीताची बाजु सांभाळणार आहेत. ही गाणी संध्याकाळच्या वेळी शांतपणे एैकावी अशा धाटणीची आहेत म्हणुनच "सूरमई शाम" असे या कार्यक्रमाला नावा देण्यात आल्याचे मुग्घा गावकर हिने सांगितले.ज्या गाण्यांचे रिकोर्डिंग झाले आहे ते केवळ वन टेक मध्ये करण्यात आल्याचेही गावकर हिने सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT