गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या उपस्थितीत राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली.
गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या उपस्थितीत राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली.Dainik Gomantak

Goa: पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ

पी. एस. श्रीधरन पिल्लई हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि लेखक आहेत. गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते मिझोराम राज्याचे १५ वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
Published on

पणजी: गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल श्रीधरन पिल्लई (Governor Sreedharan Pillai) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता (Chief Justice of the High Court Dipankar Datta) यांच्या उपस्थितीत काबो राजभवनात राज्यपाल पदाची शपथ (sworn) घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी राज्यपालांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत मंत्री विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या उपस्थितीत राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली.
नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई गोव्यात दाखल !

नवनियुक्त राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई गोव्यात काल दाबोळी विमानतळावर दुपारी दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, मंत्री मॉविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणेकर उपस्थित होते. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची गेल्या ६ जुलै रोजी मिझोरममधून गोव्यात राज्यापालपदी नियुक्ती झाली. पी. एस. श्रीधरन पिल्लई हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि लेखक आहेत. गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते मिझोराम राज्याचे १५ वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.

राज्यापालाच्या शपथविधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांचे काल संध्याकाळी गोव्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com