पणजी: एमआरएफने कुडाळ, सिंधुदुर्ग येथे गोव्यातील नोकर भरतीसाठी मुलाखती आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही नोकरभरती आयोजित करण्यात आली होती. यावरुन गोव्यातील राजकीय नेत्यांनी विरोध दर्शवला, मोठ्या वादानंतर कुडाळमधील भरती अखेर एमआरएफ कंपनीने रद्द केली आहे. मनसेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षकांनी कंपनीने ई-मेलद्वारे भरती रद्द केल्याचे कळविले आहे.
एमआरएफने फोंडा गोवा येथे नोकरीसाठी कुडाळ, सिंधुदुर्ग येथे भरती आयोजित केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही भरती आयोजित करण्यात आली होती. राहण्याची व्यवस्था, दरवर्षी पगारवाढ अशा सुविधा उमेदवरांना देण्याची हमी जाहिरातीत देण्यात आली होती. या भरतीचा मुद्दा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी उचलून धरत गोव्यात नोकरीसाठी सिंधुदुर्गमध्ये भरती कशी आयोजित केली जाऊ शकते? असा सवाल उपस्थित केला.
तसेच, गोव्यातील नोकरीसाठी गोमंतकीयांना प्राधान्य देण्याची मागणी देखील सरदेसाईंनी केली. यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान, वाद कंपनीपर्यंत पोहोचल्यानंतर कुडाळमधील भरतीची जाहीरात खोटी असल्याचा दावा त्यांनी केली. याचवेळी भरतीचे आयोजिक मनसे नेते धीरज परब यांनी ई-मेलचा पुरावा देत भरतीची जाहीरात खरी असल्याचे सांगितले. या वादातच एमआरएफने फोंड्यात या मुलाखती आयोजित केल्याची एक जाहीरात समोर आली होती.
जाहीरात खरी का खोटी यावरुन गुरुवारी वाद सुरु असाताना आता कंपनीने कुडाळमधील ही नोकरभरती रद्द केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. याबाबत कंपनीने धीरज परब यांना ई-मेलद्वारे भरती रद्द केल्याची माहिती दिली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी याबाबत माहिती दिली आहे.
"आज म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेली नोकरभरती अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे एचआर उपलब्ध नसल्याने भरती रद्द करण्यात आली आहे," अशी माहिती एमआरएफने दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.