Mountain Harvest |Goa Environment
Mountain Harvest |Goa Environment Dainik Gomanatk
गोवा

Mountain Harvest: अवैध डोंगर कापणी प्रकरणी भरारी पथकाची धडक कारवाई

दैनिक गोमन्तक

Mountain Harvest: वाडी-तळावली येथील अवैध डोंगर कापणी प्रकरणी फोंडा पोलिसांनी गावातीलच सर्वेश गावकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कारवाई झाल्यापासून सर्वेश फरार झाला आहे.

दक्षिण गोव्याच्या भरारी पथकाने फोंडा पोलिसांच्या सहकार्याने रविवारी तीन खोदकाम करणारी जेसीबी यंत्रे आणि एका ट्रकासह जिलेटीनच्या कांड्या, डिटोनेटर्स व इतर साहित्य ताब्यात घेतले होते.

काल फोंड्यातील नगर नियोजन खात्यानेही फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर वन खात्यानेही चौकशी सुरू केली आहे.

वाडी-तळावली येथे रविवारी बेकायदा डोंगर कापणी प्रकरणी दक्षिण गोव्याच्या भरारी पथकाला रेव्होल्युशनरी गोवन्स व इतर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पथकाने त्वरित फोंडा पोलिसांसह घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरू केली.

जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने पथकाने लगेच बॉम्बस्क्वॉड तसेच श्‍वान पथकाला पाचारण केले. कांड्या डोंगराच्या परिसरात लपवलेल्या सापडल्या. याशिवाय जिलेटीनच्या कांड्याच्या वापरासाठीच्या इतर वस्तूंबरोबरच 20 किलो

अमोनिया नायट्रेट, इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स व वायर्स ताब्यात घेण्याबरोबरच तीन जेसीबी यंत्रे व एक ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

सूर्यनारायण मंदिराला तडे

गेले तीन चार महिने या ठिकाणी डोंगरफोडीचे काम सुरू असून बोरी भागातील सूर्यनारायण मंदिराला तडे गेल्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली.

या डोंगर कापणीच्या कामात सर्वेश हा गुंतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फोंडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता स्फोटक वस्तू वापरण्यासंबंधीचा गुन्हा तसेच बेकायदा डोंगरकापणी केल्याने नगर नियोजन खात्यांतर्गत असलेला गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी फोंडा पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर व पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT