Goa Dairy: ‘गोवा डेअरीतील ‘त्या’ प्रकारांची चौकशी करा!’

गोवा डेअरीने सहकार निबंधकांना गोवा डेअरीतील प्रशासकांच्या कार्यकाळातील अनागोंदी कारभार लेखा परीक्षणाच्या अहवालाबाबतही चौकशी करावी, अशी मागणी डेअरीच्या नऊ संचालकांनी पत्राद्वारे केली आहे.
Goa Dairy
Goa DairyDainik Gomantak

Goa Dairy: गोवा डेअरीने सहकार निबंधकांना गोवा डेअरीतील प्रशासकांच्या कार्यकाळातील अनागोंदी कारभार आणि 2021 व 2022 च्या लेखा परीक्षणाच्या अहवालाबाबतही चौकशी करावी, अशी मागणी डेअरीच्या नऊ संचालकांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, माधव सहकारी व अनुप देसाई यांच्या संचालक पदाच्या राजीनाम्याबाबत बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सहकार निबंधकांना पाठविलेल्या निवेदनावर गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई, संचालक उल्हास सिनारी, विटोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब, बाबूराव फट्टो देसाई, उदय प्रभू, नितीन प्रभुगावकर व बाबू फाळो यांच्या सह्या आहेत.

Goa Dairy
Goa News: ‘त्या’ आमदारांना दिली सहा आठवड्यांची मुदत

त्यात म्हटले आहे, की भक्ती एक्सट्रॅक्शन या कंपनीच्या पशुखाद्य बिलाची 24 लाख 77 हजार रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. वास्तविक या कंपनीचा कच्चा माल सदोष असल्याने तो परत न्यावा असे सूचवण्यात आले होते व कंपनीने तो परतही नेला. मग ही रक्कम कशी काय अदा केली? हा मुद्दा लेखा परीक्षकाने नोंदवला आहे.

जळाऊ लाकूड घेण्यासाठी काढलेली निविदा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या निविदाधारकाला देण्यात आली, गोवा डेअरीची आर्थिक स्थिती कमकुवत असतानाही प्रशासकांच्या कार्यकाळात दीड कोटी रुपये दूध उत्पादक संस्थांना देण्यात आले,

नवीन दूध प्रकल्प निर्मितीसाठी अरुण पाटील याची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली व त्याला 5 लाख 90 हजार रुपयांची रक्कम अदा करण्यात आली, प्रत्यक्षात नवीन प्रकल्प उभारणीसाठी कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

Goa Dairy
Goa News: गरम पाण्याच्या टबमध्ये पडून चिमुरडीचा मृत्यू

मोलेसीस टाकीच्या दुरुस्तीकामातही घोळ!

गोवा डेअरीचे दूध पावडरमध्ये रुपांतरित करण्यासाठी कमी दराने विकले गेले, आणि ही पावडर साठवण्यासाठी जागा भाड्याने घेण्यात आली, त्यामुळे गोवा डेअरीला नुकसान सोसावे लागले. प्रशासकीय समितीच्या ठरावानुसार वकिलाला दिलेली फी तत्कालीन कार्यकारी संचालक अनिल फडते यांच्याकडून वसूल करावी, असे ठरवण्यात आले होते.

कृषी पणन मंडळाला देण्यासाठी राज्याबाहेरून आणण्यात आलेल्या दुधावरचे मार्केट शुल्क कापण्यात आले, पण त्याचा भरणा केलाच नाही. गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पाच्या मोलेसीस टाकीच्या दुरुस्तीकामातही घोळ झाला असल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून त्यानुसार सहकार निबंधकांनी चौकशी करावी, अशी मागणी या नऊही संचालकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com