Mormugao Municipality Garbage Problem  Dainik Gomantak
गोवा

सडा भागात मुरगाव पालिकेचा कचरा रस्त्यावरच; नागरिक त्रस्त

चिखली पंचायतीचा कचराही येथे ओतण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Mormugao Municipality: सडा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचरा लगतच्या रस्त्यावर पसरल्याने सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी संताप व्यक्त केला. रस्त्यावर कचरा पसरविणे हा 'स्वच्छ भारत अभियान' आहे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सडा भागात मुरगाव पालिकेचा कचरा (Garbage) प्रक्रिया प्रकल्प आहे. मुरगाव पालिका (Mormugao Municipality) क्षेत्रातील ओला व सुका कचरा गोळा करून या प्रकल्पामध्ये ओतण्यात येतो. तसेच चिखली पंचायतीचा कचराही येथे ओतण्यात येतो. या प्रकल्पातील कचऱ्यावर जलदगतीने प्रक्रिया होत नसल्याने कचरा साठविला जातो. त्यामुळे तेथे कचऱ्याचे ढीग तयार होतात.

मध्यंतरी सर्व ढीग हटविण्यात आले होते. परंतु, आता पुन्हा कचरा प्रक्रिया प्रकल्पातून कचरा बाहेरच्या रस्त्यावर येऊ लागला आहे. त्यामुळे तेथे भटकी जनावरे, कुत्री जमा होत असल्याने तसेच दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना या रस्त्यावरून येणे-जाणे त्रासदायक ठरत आहे. सदर कचरा कुंपणाबाहे तसेच रस्त्यावर टाकण्यात आल्यावर तो पुन्हा प्रकल्पाच्या आतमध्ये टाकण्यासाठी हालचाल करण्याची गरज पोळजी यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या गोडव्यावर महागाईचे सावट! साहित्याचे दर वाढले; वाण खरेदीसाठी बाजारात लगबग

Goa Tourism: देशी, विदेशी पर्यटक वाढले! चार्टर विमानांच्या लँडिंगमध्ये वाढ; पर्यटन खात्‍याचा दावा

Abhang Repost: ‘रेव्‍ह पार्ट्या - ड्रग्स पार्ट्या सुरू, अभंगा’वर मात्र बंदी'! 'अभंग रिपोस्ट' रद्द केल्याने रसिक संतप्त Watch Video

Transcend Goa 2026: देशातील 1ल्या ‘ट्रान्समीडिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन गोव्यात! भविष्याकडे पाहणारे व्यासपीठ; स्थानिक ‘कंटेंट’ला प्रोत्साहन

‘देव बरे करू!’ गोव्याच्या आत्म्याचे संगीतमय दर्शन, खरी संस्कृती जगासमोर; उलगडला समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडील गोवा

SCROLL FOR NEXT