internet cable  Dainik Gomantak
गोवा

वीज खांबावरील इंटरनेट केबल मुरगाव नगरपालिका लवकरच कापणार

पादचारी, वाहन चालकांना धोकादायक ठरत असल्याने नागरिकांनी केली कारवाईची मागणी

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव नगरपालिका क्षेत्रातील वीज खांबावर विविध इंटरनेट केबल टाकून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले असून, लवकरच सर्व खांबावरील इंटरनेट केबल कापून टाकण्याचे आदेश पालिकेतर्फे देण्यात आले आहे. (Mormugao municipality will cut the internet cable on the power pole )

काही दिवसांपूर्वी वास्को स्वतंत्र पथ मार्ग, मॉडर्न मार्केट समोर इंटरनेट केबल रस्त्यावर सांडल्याने एका मुलाच्या पायाखाली केबल आल्याने तो रस्त्यावर पडला होता. सुदैवाने त्याचवेळी रस्त्यावर वाहनाची वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या हे सर्व केबल पादचाऱ्यांबरोबर वाहन चालकांना डोकेदुखी ठरली असल्याने, पालिकेने शहरातील सर्व खांबावरील केबलवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहे.

वास्को भागात अनेक ठिकाणी वीज विभागाच्या खांबावर मुरगाव नगरपालिकेची परवानगी नसताना टाकलेले सर्व इंटरनेट व इतर केबल त्वरित काढण्याचे आदेश मुरगाव नगरपालिका अधिकाऱ्यामार्फत देण्यात आले आहे. वास्कोतील स्वतंत्र पथ मार्गावरील वीज खांबावर विजेच्या वाहिन्याबरोबर विविध कंपन्यांचे इंटरनेट केबल असून यातील बहुतेक केबल तुटून रस्त्यावर पडल्याने पादचारी, वाहन चालकांना धोकादायक ठरत आहे.

यामुळे रस्त्यावरून जाताना दुचाकी वाहन वाहनांना या केबलमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पालिका व वीज विभागाने वरील खांबावरील केबल त्वरित काढावे अशी मागणी समाज कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी केली होती.

दरम्यान वाढत्या तक्रारीची दखल घेत मुरगाव नगरपालिका अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथ, एफएल गोम्स दत्तात्रेय मार्गाबरोबर इतर रस्त्यावरील सर्व केबल काढण्याचे आदेश जारी केले आहे. रस्त्यावर पडलेल्या केबलमुळे पादचाऱ्यांना खूप त्रासदायक ठरल्या असल्याने अखेर पालिकेने केबल कापून टाकण्याचे आदेश जारी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT