Vasco Market Dainik Gomantak
गोवा

Vasco Market: मुरगाव पालिकेच्या नियमांना हरताळ, वास्को मार्केट बनलं 'अडथळ्यांचं आगर'; कारवाईच्या इशाऱ्यानंतरही विक्रेत्यांची दादागिरी सुरुच

Market Encroachment Goa: विक्रेत्यांना आपल्या दुकानासमोर तीन चार क्रेट लावल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानंतर कामगारांनी तेथे पिवळ्या रंगाची पट्टी आखली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: वास्को येते आखून दिलेल्या पिवळ्या पट्टीच्या बाहेर ठेवलेले साहित्य जप्त करण्याचा इशारा मुरगाव (Mormugao) पालिकेने दिला होता, तरीही येथील भाजी मार्केटामधील व्यावसायिकांनी पिवळ्या पट्टीच्या बाहेर साहित्य ठेवून अतिक्रमण सुरूच ठेवले आहे. त्यामुळे या विक्रेत्यांवर पालिका काय कारवाई करते याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

येथील भाजी मार्केटात (Market) भाजीसह फळे, नारळ, किराणा माल विक्रेते व्यवसाय करतात. त्यापैकी बहुतांश विक्रेत्यांनी दुकानांऐवजी रस्त्यावर साहित्य ठेवून अतिक्रमण चालवले आहे. रस्त्यावर अतिक्रमणे होत असल्याने ग्राहकांना चालणे कठीण होते. याची दखल घेत मुरगाव पालिकेने अनेक वेळा विक्रेत्यांविरोधात कारवाई केली, मात्र त्या कारवाईचा काहीच फायदा झाला नाही. येथील विक्रेते आपली दुकाने रिकामी ठेवतात व साहित्य रस्त्यावर मांडत असल्याने ग्राहकांना मार्केटमध्ये फिरणे कठीण होते.

भाजी मार्केटातील बहुतांश विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमणे केल्याने आम्हाला रस्त्यावरून चालणेही कठीण झाल्याच्या तक्रारी काहीजणांनी पालिकेला केल्यानंतर नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी या मार्केटाला भेट देऊन पाहणी केली व येथील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश बाजार निरीक्षक व कामगारांना दिलेले. त्यानुसार तेथील प्लास्टिक ताडपत्र्या हटविण्यात आल्या होत्या. तसेच विक्रेत्यांना आपल्या दुकानासमोर तीन चार क्रेट लावल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानंतर कामगारांनी तेथे पिवळ्या रंगाची पट्टी आखली होती. त्या पट्टीच्या बाहेर माल लावल्यास कारवाई करण्यात येईल, असे विक्रेत्यांना सांगण्यात आले होते.

मात्र या पिवळ्या पट्टीकडे विक्रेत्यांना दुर्लक्ष करून नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्या पिवळ्या पट्टीवरच क्रेट व इतर वस्तू ठेवण्यात येत असल्याने ती पट्टीच कोणाच्याही नजरेस येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT