Vasco Sunday Market Fire: ‘संडे मार्केट’ मधील तीन दुकाने आगीत भस्मसात! दहा ते बारा लाखांचे नुकसान; शार्ट सर्किटची शक्यता

Vasco Fire Accident: वास्को येथील ‘संडे मार्केट’मधील काल तीन दुकाने आगीत भस्मसात झाल्याने तसेच एका दुकानाला आगीची झळ पोहचल्याने सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले.
Vasco Sunday Market Fire: ‘संडे मार्केट’ मधील तीन दुकाने आगीत भस्मसात! दहा ते बारा लाखांचे नुकसान; शार्ट सर्किटची शक्यता
Vasco Sunday Market FireDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को येथील ‘संडे मार्केट’मधील काल तीन दुकाने आगीत भस्मसात झाल्याने तसेच एका दुकानाला आगीची झळ पोहचल्याने सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधितांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक साहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, ही आग शार्ट सर्किटने लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संडे मार्केटातील काही दुकानातून धुराचे लोट मध्यरात्रीच्या सुमारास येत असल्याचे पाहून कोणीतरी पोलिस तसेच अग्निशमन दल, वीज खाते इत्यादींना माहिती दिली. त्यानंतर वास्को अग्निशमन दल तेथे पोहचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आग (Fire) इतरत्र पसरून इतर दुकानांनी पेट घेऊ नये यासाठी त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली. वीज खात्याच्या कामगारांनी तेथील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. वीज कामगार व अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामगिरीमुळे आग इतरत्र पसरण्याचा मोठा धोका टळला.

Vasco Sunday Market Fire: ‘संडे मार्केट’ मधील तीन दुकाने आगीत भस्मसात! दहा ते बारा लाखांचे नुकसान; शार्ट सर्किटची शक्यता
Vasco Market : सडा येथील मार्केट प्रकल्प होणार लवकरच कार्यान्वित, दुकानगाळ्यांचा झाला लिलाव

या आगीत रफीक, दीपक मिश्रा, रेश्मा यांच्या दुकानातील सर्व वस्तू भस्मसात झाल्या, तर समैरुद्दीन यांच्या दुकानाला काही प्रमाणात झळ पोचल्याने काही रेडिमेड कपडे जळाले. रफीक यांचे सर्वात अधिक नुकसान झाले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात रेडिमेड कपडे विक्रीसाठी आणले होते. ते सर्व या आगीत जळाले. आपले सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या दुकानाला लागून दीपक मिश्रा यांचे चप्पल, बुट विक्रीचे दुकान आहे. त्या दुकानातील मालही जळाला. रेश्मा यांच्या दुकानातील तयार कपडे जळाले. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या एका दुकानात अग्निसुरक्षा उपकरण होते, परंतु आग रात्रीच्यावेळी लागल्याने त्याचा वापर होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com